ग्रुप कसा तयार करावा आणि ग्रुपमध्ये कसे आमंत्रित करावे

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही कमाल २५६ सदस्यांचा WhatsApp ग्रुप तयार करू शकता.
ग्रुप तयार करणे
  1. WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
    > नवीन ग्रुप यावर टॅप करा.
    • किंवा, नवीन चॅट
      > नवीन ग्रुप यावर टॅप करा.
  2. तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा. त्यानंतर, हिरव्या बाणाच्या चिन्हावर टॅप करा.
  3. ग्रुपला नाव द्या. हे नाव ग्रुपमधील सर्वांना दिसेल.
    • ग्रुपच्या नावामध्ये जास्तीतजास्त २५ कॅरेक्टर्स असू शकतात.
    • तुम्ही इमोजी
      वर टॅप करून तुमच्या नावामध्ये इमोजी समाविष्ट करू शकता.
    • तुम्ही कॅमेरा चिन्हावर टॅप करून ग्रुप आयकॉन जोडू शकता. इमेज जोडण्यासाठी कॅमेरा, गॅलरी किंवा वेबवर शोधा या पर्यायांपैकी एक पर्याय निवडा. इमेज निवडून सेट केल्यावर, चॅट टॅबमधील ग्रुपच्या नावासमोर ग्रुप आयकॉन दिसू लागेल.
  4. हे करून झाले की, हिरव्या बरोबरच्या खुणेवर टॅप करा.
लिंक वापरून ग्रुपमध्ये आमंत्रित करणे
तुम्ही ग्रुप ॲडमिन असल्यास, तुम्ही लोकांसोबत लिंक शेअर करून त्यांना ग्रुपमध्ये आमंत्रित करू शकता. ॲडमिन जुनी निमंत्रण लिंक अवैध करून नवी लिंक तयार करण्याकरिता कधीही लिंक रिसेट करू शकतात.
  1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
    • किंवा, चॅट टॅबवर जाऊन ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय
      > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
  2. लिंक वापरून आमंत्रित करा वर टॅप करा.
  3. लिंक पाठवण्यासाठी WhatsApp द्वारे लिंक पाठवा, लिंक कॉपी करा किंवा इतर ॲपद्वारे लिंक शेअर करा किंवा QR कोड या पर्यायांमधून एक पर्याय निवडा.
    • जर तुम्ही WhatsApp द्वारे लिंक पाठवत असाल, तर संपर्क शोधा किंवा निवडा, त्यानंतर पाठवा
      वर टॅप करा.
    • लिंक रिसेट करण्यासाठी, लिंक रिसेट करा > लिंक रिसेट करा यावर टॅप करा.
टीप:
  • तुम्ही ज्या WhatsApp वापरकर्त्यांसोबत आमंत्रण लिंक शेअर करत आहात, ते वापरकर्ते त्या लिंकच्या मदतीने ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात. त्यामुळे हे फीचर केवळ तुमच्या विश्वासातल्या व्यक्तींसोबतच वापरा. कारण, या व्यक्ती तुमची लिंक इतरांनाही फॉरवर्ड करू शकतात आणि लिंक मिळालेल्या इतर व्यक्तींना ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी ग्रुप ॲडमिनच्या संमतीची गरज लागत नाही.
  • आम्ही येत्या काही महिन्यांत हळूहळू ग्रुपचा आकार वाढवणार आहोत; त्यामुळे हे फीचर ॲक्सेस करण्यास विलंब होऊ शकतो.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही