बिझनेस चॅट्सना संमती देणे

तुमच्यासोबत कोण चॅट करत आहे हे तुम्ही नियंत्रित करावे असे WhatsApp ला वाटते. म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत चॅट करण्यास संमती देत नाही तोपर्यंत बिझनेस तुमच्यासोबत संभाषण चालू करू शकत नाही.
जेव्हा एखादा बिझनेस तुम्हाला पहिल्यांदा मेसेज करतो तेव्हा तुमच्याकडे संभाषण कसे साधायचे हे निवडण्याचे तीन वेगळे पर्याय असतील. हे करा:
  • एखाद्या बिझनेसला तुमच्या ब्लॉक केलेले संपर्क यादीमध्ये जोडण्यासाठी ब्लॉक करा. तुम्ही बिझनेसला ब्लॉक केल्यावर, ते तुम्हाला थेट मेसेज करू शकणार नाहीत. असे असले तरीही, तुम्हाला त्यांच्या बिझनेस प्रोफाइल आणि कॅटलॉगचा ॲक्सेस असेल. ते ज्या ग्रुपमध्ये आहेत त्यापैकी कोणत्याही ग्रुपमध्ये तुम्ही असलात तर, तुम्ही त्यांच्याशी संभाषणदेखील करू शकाल.
  • एखादा बिझनेस आमच्या व्यावसायिक धोरणाचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास त्याची तक्रार करण्यासाठी तक्रार नोंदवा. तुम्ही बिझनेसला ब्लॉक करण्यासाठी देखील हा पर्याय वापरू शकता.
  • बिझनेससोबत चॅट करण्याचा पर्याय निवडण्यासाठी पुढे सुरू ठेवा. तुम्ही बिझनेस मेसेज पाठवून देखील संमती देऊ शकता.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही