व्यस्तता संदेश कसे वापरावेत

व्यस्तता संदेश सुरू केलेले असतात, तेव्हा तुम्हाला मेसेज करणाऱ्या ग्राहकांना तुम्ही व्यस्त असल्याचा किंवा तुमचा फोन तुमच्याजवळ नसल्याचा कस्टमाइझ करण्यायोग्य मेसेज आपोआप मिळेल. कोणत्या ग्राहकांना व्यस्तता संदेश पाठवावेत आणि कधी पाठवले जावेत हे तुम्ही निवडू शकता.
बिझनेसशी संबंधित टीप: व्यस्तता संदेश वापरल्यामुळे तुम्हाला तुमच्या खाजगी वेळेत मेसेजेसना उत्तर द्यावे लागत नाही. शिवाय, तुम्ही तुमच्या ग्राहकांना दुर्लक्षित करत नाही आहात याची त्यांना खात्री होते.
व्यस्तता संदेश सेट करणे
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > व्यस्तता संदेश यावर टॅप करा.
 3. व्यस्तता संदेश पाठवा सुरू करा.
 4. मेसेज अंतर्गत, मेसेज संपादित करण्यासाठी त्यावर टॅप करा, त्यानंतर सेव्ह करा वर टॅप करा.
 5. तुमचा व्यस्तता संदेश शेड्यूल करण्यासाठी, शेड्यूल करा वर टॅप करा. खालीलपैकी एक पर्याय निवडा:
  • नेहमीच पाठवा: नेहमी पाठवा.
  • कस्टम शेड्यूल: फक्त नमूद केलेल्या कालावधीमध्ये पाठवा.
  • कामाचे तास उलटून गेल्यावर फक्त कामाचे तास उलटून गेल्यावर पाठवा.
   • टीप: तुम्ही तुमच्या बिझनेस प्रोफाइलमध्ये कामाचे तास सेट केले असतील, तरच तुम्हाला हा पर्याय वापरता येईल.
 6. तुमचा व्यस्तता संदेश कोणाला मिळावा हे ठरवण्यासाठी प्राप्तकर्ते वर टॅप करा. खालीलपैकी एक पर्याय निवडा:
  • सर्वजण: 'व्यस्तता संदेश' हे फीचर सुरू केले असताना तुम्हाला मेसेज करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठवा.
  • अ‍ॅड्रेस बुकमध्ये नसलेले सर्वजण: फक्त तुमच्या अ‍ॅड्रेस बुकमध्ये नसलेल्या ग्राहकांना पाठवा.
  • पुढील अपवाद वगळता सर्वजण…: तुम्ही निवडलेल्या ग्राहकांना वगळून सर्व ग्राहकांना पाठवा.
  • फक्त यांना पाठवा…: फक्त निवडलेल्या संपर्कांना पाठवा.
टीप: व्यस्तता संदेश पाठवण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवर सक्रिय इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
हे मदतीचे होते का?
होय
नाही