तुमच्या बिझनेस प्रोफाइलविषयी माहिती

तुमचे 'बिझनेस प्रोफाइल' हे WhatsApp Business ॲपमधील असे टूल आहे, ज्यामुळे तुम्हाला WhatsApp वर तुमच्या बिझनेसचे अधिकृत स्थान निर्माण करण्यात मदत होते.

तुमच्या बिझनेस प्रोफाइलमुळे ग्राहकांना तुमच्या बिझनेसचे नाव, पत्ता, बिझनेस वेळापत्रक आणि कॅटेगरी अशी महत्त्वाची माहिती मिळते. तुमच्या बिझनेसची एंगेजमेंट वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या बिझनेसचा ईमेल आणि तुमच्या वेबसाइटच्या लिंक्स तसेच सोशल मीडिया खाती वापरता त्याप्रमाणे तुमच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसचा कॅटलॉग देखील तयार करू शकता.
बिझनेसशी संबंधित टीप: ग्राहकांना तुमची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस सहजरीत्या ब्राउझ करता यावीत आणि प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला मेसेज करता यावा यासाठी तुमची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस प्रदर्शित करणारा कॅटलॉग समाविष्ट करा. ग्राहक त्यांना ज्यात रस आहे असे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस निवडून त्यांच्या संपर्कांसोबत शेअरदेखील करू शकतात.
ही खास फीचर्स तुमचा वेळ आणि ऊर्जा वाचवतात. त्यामुळे तुम्ही अधिक महत्त्वाच्या कामांवर - म्हणजेच ग्राहकांशी संपर्क वाढवून तुमचा बिझनेस वृद्धिंगत करण्यावर, तुमचे लक्ष केंद्रित करू शकता.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही