ग्रुप कसा तयार करावा आणि ग्रुपमध्ये कसे आमंत्रित करावे

तुम्ही कमाल २५६ सदस्यांचा WhatsApp ग्रुप तयार करू शकता.
ग्रुप तयार करणे
  1. WhatsApp उघडा आणि चॅट टॅबवर जा.
  2. नवीन चॅट
    > नवीन ग्रुप वर टॅप करा.
    • जर तुमच्याकडे चॅट टॅबमध्ये अगोदरपासूनच चॅट उपलब्ध असेल तर, नवीन ग्रुप वर टॅप करा.
  3. तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा. त्यानंतर पुढे वर टॅप करा.
  4. ग्रुपला नाव द्या. हे नाव ग्रुपमधील सर्वांना दिसेल.
    • ग्रुपच्या नावामध्ये जास्तीतजास्त २५ कॅरेक्टर्स असू शकतात.
    • तुम्ही कॅमेरा चिन्हावर टॅप करून ग्रुप आयकॉन जोडू शकता. इमेज जोडण्यासाठी फोटो घ्या, फोटो निवडा किंवा वेबवर शोधा या पर्यायांपैकी एक पर्याय निवडा. इमेज निवडून सेट केल्यावर, चॅट टॅबमधील ग्रुपच्या नावासमोर ग्रुप आयकॉन दिसू लागेल.
  5. सर्व झाल्यावर तयार करा वर टॅप करा.
लिंक वापरून ग्रुपमध्ये आमंत्रित करणे
तुम्ही ग्रुप ॲडमिन असल्यास, तुम्ही लोकांसोबत लिंक शेअर करून त्यांना ग्रुपमध्ये आमंत्रित करू शकता. ॲडमिन जुनी निमंत्रण लिंक अवैध करून नवी लिंक तयार करण्याकरिता कधीही लिंक रिसेट करू शकतात.
  1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
    • किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
  2. लिंकद्वारे ग्रुपमध्ये आमंत्रित करा वर टॅप करा.
  3. लिंक पाठवण्यासाठी लिंक शेअर करा, लिंक कॉपी करा किंवा QR कोड या पर्यायांमधून एक पर्याय निवडा.
    • लिंक रिसेट करण्यासाठी, लिंक रिसेट करा > लिंक रिसेट करा यावर टॅप करा.
टीप:
  • तुम्ही ज्या WhatsApp वापरकर्त्यांसोबत आमंत्रण लिंक शेअर करत आहात, ते वापरकर्ते त्या लिंकच्या मदतीने ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात. त्यामुळे हे फीचर केवळ तुमच्या विश्वासातल्या व्यक्तींसोबतच वापरा. कारण, या व्यक्ती तुमची लिंक इतरांनाही फॉरवर्ड करू शकतात आणि लिंक मिळालेल्या इतर व्यक्तींना ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी ग्रुप ॲडमिनच्या संमतीची गरज लागत नाही.
  • आम्ही येत्या काही महिन्यांत हळूहळू ग्रुपचा आकार वाढवणार आहोत; त्यामुळे हे फीचर ॲक्सेस करण्यास विलंब होऊ शकतो.
हे मदतीचे होते का?
होय
नाही