ग्रुपमध्ये 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू किंवा बंद कसे करावे

'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करून तुम्ही WhatsApp वर नाहीसे होणारे मेसेजेस पाठवू शकता. या फीचरअंतर्गत तुम्ही मेसेजेस २४ तासांनी, ७ दिवसांनी किंवा ९० दिवसांनी नाहीसे होण्याचा पर्याय निवडू शकता. हे फीचर सुरू केल्यानंतर, चॅटमध्ये पाठवलेले नवीन मेसेजेस तुम्ही निवडलेल्या कालावधीनंतर नाहीसे होतील. या सेटिंगचा तुम्ही ते सेटिंग सुरू करण्याआधी पाठवलेल्या किंवा तुम्हाला मिळालेल्या मेसेजेसवर परिणाम होत नाही.
'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करणे
ग्रुप चॅट असल्यास ग्रुपचा कोणताही सदस्य 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू किंवा बंद करू शकतो. तथापि, फक्त ॲडमीनला 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करायची अनुमती द्यायची असल्यास ग्रुप ॲडमीन तशा पद्धतीने ग्रुप सेटिंग्ज बदलू शकतो. ग्रुप ॲडमीन सेटिंग्ज कशी बदलावी हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
 1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा.
 2. पर्याय > ग्रुपविषयी माहिती > ठीक आहे प्रेस करा.
 3. एक्स्पायर होणारे मेसेजेस > संपादन निवडा.
  • सूचना दिसल्यास, पुढे > ठीक आहे प्रेस करा.
 4. २४ तास, ७ दिवस किंवा ९० दिवस > ठीक आहे निवडा.
तुम्ही नवीन ग्रुप चॅट तयार करत असतानादेखील 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करू शकता.
'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर बंद करणे
ग्रुप ॲडमीनने 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर बंद करण्याचे अधिकार फक्त ॲडमीन्सपुरता मर्यादित न ठेवल्यास, ग्रुप चॅटमधील कोणताही सदस्य हे फीचर कधीही बंद करू शकतो.
 1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा.
 2. पर्याय > ग्रुपविषयी माहिती > ठीक आहे प्रेस करा.
 3. एक्स्पायर होणारे मेसेजेस > संपादन निवडा.
  • सूचना दिसल्यास, पुढे > ठीक आहे प्रेस करा.
 4. बंद करा > ठीक आहे निवडा.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही