डार्क मोड कसा वापरावा
डार्क मोडच्या मदतीने तुम्हाला WhatsApp ची नेहमीची लाइट कलर थीम बदलून डार्क कलर थीम निवडता येते.
डार्क मोड वापरणे
- WhatsApp उघडा, त्यानंतर तुमच्या चॅट लिस्टच्या वर असलेल्या मेनूवर क्लिक करा.
- सेटिंग्ज > थीम वर क्लिक करा.
- तुम्ही खालील पर्याय निवडू शकता:
- लाइट: हा पर्याय निवडल्याने डार्क मोड बंद होतो.
- डार्क: हा पर्याय निवडल्याने डार्क मोड सुरू होतो.
- सिस्टीम डिफॉल्ट: WhatsApp ची थीम तुमच्या डिव्हाइसच्या थीमशी जुळवण्यासाठी तुम्ही हा पर्याय निवडू शकता. याचाच अर्थ, जर डिव्हाइसची थीम डार्क असेल, तर WhatsApp ची थीमदेखील डार्कच होईल.