एखाद्या संपर्काच्या खात्याची ओळख पटत नाही आहे

एखाद्या व्यक्तीने फोन नंबर बदलल्यास त्या व्यक्तीचा जुना फोन नंबर तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमधून काढून टाकण्याची खबरदारी घ्या. मोबाइल सर्व्हिस प्रोव्हाइडरने त्या व्यक्तीचा जुना फोन नंबर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला दिला आहे असे होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला त्या व्यक्तीचे WhatsApp मधील खाते हे तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे खाते आहे असे वाटू शकते, पण प्रत्यक्षात तो फोन नंबर तुमच्या मित्राचा/मैत्रिणीचा नसून त्या नव्या व्यक्तीचा असतो.
WhatsApp मधील खात्याची ओळख ही फोन नंबरशी जोडलेली असते आणि खात्याचे नाव दाखवतानाही तुम्ही एखाद्या संपर्काचे नाव तुमच्या ॲड्रेस बुकमध्ये ज्याप्रकारे सेव्ह केले आहे तेच नाव वापरले जाते.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही