डेटा रोमिंगवर लागणाऱ्या शुल्काविषयी माहिती

फोनवरील वेब ब्राउझिंगसाठी किंवा ईमेल्ससाठी जे इंटरनेट कनेक्शन वापरले जाते, तेच इंटरनेट कनेक्शन WhatsApp वापरते. तुम्ही तुमचा फोन रोमिंगमध्ये असताना WhatsApp वापरलेत, तर मोबाइल डेटा वापरावर शुल्क लागू शकते. इतर देशांमध्ये असताना रोमिंगवर किती शुल्क लागते याविषयी माहिती मिळवण्यासाठी तुमच्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधा.
तुमचा मोबाइल डेटा प्लॅन हा आंतरराष्ट्रीय नसेल, तर तुम्ही खालील गोष्टी कराव्यात असे आम्ही सुचवतो:
  • रोमिंगमध्ये असताना डेटाच्या वापरावर शुल्क लागू नये यासाठी मोबाइल डेटा आणि डेटा रोमिंग बंद करा. हे कसे करावे याविषयी माहिती मिळवण्यासाठी तुमच्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरच्या सपोर्ट वेबसाइटला भेट द्या.
  • मोबाइल इंटरनेट कनेक्शनचा वापर अनिवार्य असेल तर, डेटा वापरावर अतिरिक्त शुल्क लागू नये यासाठी मीडिया ऑटो-डाउनलोड आणि रोमिंग बंद करा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर ऑटो-डाउनलोड कसे कॉन्फिगर करावे: Android | iPhone
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही