iCloud कीचेनमध्ये WhatsApp क्रिडेन्शियल्स सेव्ह करण्याबद्दल

तुम्ही WhatsApp Messenger किंवा WhatsApp Business ॲप वर फोन नंबर नोंदविता तेव्हा तो फोन नंबर सत्यापित करण्यासाठी आपल्याला 6-अंकी एसएमएस कोड प्राप्त होईल. iCloud कीचेन जेव्हा चालू वर सेट केलेली असते तेव्हा तुमची क्रिडेन्शियल्स अर्थात प्रमाणपत्रे साठवून ठेवते, यामुळे तुम्हाला व्हेरिफिकेशन प्रक्रियेमध्ये न जाता नवीन डिव्हाइसवर तुमचा फोन नंबर विनासायास रजिस्टर करता येतो.
टीप : जर फोन नंबर नवीन असेल तर iCloud कीचेन चालू असली तरीही एसएमएस व्हेरिफिकेशन आवश्यक असेल.
तुमच्या iCloud कीचेनमध्ये संग्रहीत सर्व माहिती एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केलेली आहे. Apple किंवा WhatsApp दोघांनाही ही माहिती ॲक्सेस करता येणार नाही.
iCloud Keychain विषयी इतर माहिती व ते सक्षम कसे करावे याविषयी जाणून घेण्यासाठी Apple सपोर्टशी संपर्क साधा.
माहिती स्रोत
iPhone वर तुमच्या फोन नंबरचे व्हेरिफिकेशन कशी कराल ते जाणून घेण्यासाठी, हा लेख वाचा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही