WhatsApp डेस्कटॉप कसे डाउनलोड करावे

WhatsApp तुमच्या डेस्कटॉपवर ब्राउझरशिवायही वापरता येऊ शकते. तुमच्या कॉंप्युटरवर WhatsApp इंस्टॉल करण्यासाठी ते Microsoft Store, Apple App Store किंवा WhatsApp च्या वेबसाइटवरून डाउनलोड करा. ऑपरेटिंग सिस्टीमविषयक खालील बाबींची पूर्तता करणाऱ्या कॉंप्युटरवरच WhatsApp डेस्कटॉप चालू शकेल:
  • Windows 8.1 किंवा त्याहून नवी आवृत्ती
  • macOS 10.11 किंवा त्याहून नवी आवृत्ती
इतर ऑपरेटिंग सिस्टीम्ससाठी तुम्ही तुमच्या ब्राउझरवर WhatsApp वेब वापरू शकता.
WhatsApp डेस्कटॉप डाउनलोड करणे
  1. तुमच्या कॉंप्युटरच्या ब्राउझरमध्ये WhatsApp डाउनलोड पेज वर जा आणि तिथून .exe किंवा .dmg फाइल डाउनलोड करा.
  2. डाउनलोड पूर्ण झाल्यावर डाउनलोड केलेली .exe किंवा .dmg फाइल उघडा आणि इंस्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी दिसणाऱ्या सूचनांचे पालन करत जा.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही