मला माझा व्हिडिओ खूपच मोठा आहे आणि तो पाठवला जाणार नाही असा मेसेज आला

सर्व प्लॅटफॉर्म्सवर WhatsApp द्वारे सर्व मीडिया (फोटो, व्हिडिओ किंवा व्हॉइस मेसेजेस) पाठवण्यासाठी किंवा फॉरवर्ड करण्यासाठी कमाल फाइल साइझ मर्यादा 16 MB इतकी आहे.
बहुतेक फोन्समध्ये, या साइझमध्ये बसणारा व्हिडिओ जवळजवळ 90 सेकंद ते 3 मिनिटे इतक्या लांबीचा असतो. कमाल व्हिडिओ कालावधी तुमच्या फोनच्या व्हिडिओ कॅमेऱ्याच्या गुणवत्तेनुसार बदलू शकतो. अधिक मोठा व्हिडिओ पाठवण्यासाठी, तुम्ही WhatsApp ऐवजी दुसरीकडे कमी रिझोल्यूशनचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता आणि चॅटमधील 'मीडिया फीचर जोडा' वापरून तो तुमच्या संपर्कांना पाठवू शकता.
स्टेटससाठी, तुम्ही कमाल 30 सेकंदांचा व्हिडिओ शेअर करू शकता. सध्या, स्टेटस वर जास्त लांबीचे व्हिडिओ शेअर करता येत नाहीत.
तुम्ही पूर्वी प्राप्त झालेला एखादा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करत असल्यास, तुम्हाला WhatsApp द्वारे व्हिडिओ फॉरवर्ड करण्यासाठी चॅटमधील 'मीडिया फॉरवर्ड करा' हे फीचर वापरता येईल.
टीप: डॉक्युमेंट्ससाठी कमाल साइझ मर्यादा 100 MB इतकी आहे.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही