ग्रुप चॅटमध्ये पुन्हा सामील कसे व्हावे

तुम्ही ज्या ग्रुपमधून बाहेर पडलात त्यामध्ये पुन्हा सामील व्हायचे असल्यास, ग्रुप ॲडमिनला तुम्हाला ग्रुपमध्ये पुन्हा आमंत्रित करावे लागेल. तुम्ही एखाद्या ग्रुपचे एकमेव ग्रुप ॲडमिन असल्यास आणि तुम्ही त्या ग्रुपमधून बाहेर पडल्यास, नवीन ग्रुप ॲडमिन बनवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या सदस्याची रँडमली निवड केली जाते. तुम्ही त्या ॲडमिनला तुम्हाला ग्रुपमध्ये पुन्हा आमंत्रित करण्यास आणि ग्रुप ॲडमिन बनवण्यास सांगू शकता.
दोन वेळा बाहेर पडलेल्या ग्रुपमध्ये पुन्हा सामील होणे
तुम्ही दोन वेळा बाहेर पडला आहात अशा ग्रुपमध्ये तुम्हाला पुन्हा सामील व्हायचे असल्यास, ग्रुप ॲडमिनने तुम्हाला पुन्हा आमंत्रित करेपर्यंत तुम्ही २४ तास थांबणे आवश्यक आहे. तुम्हाला पुन्हा आमंत्रित करेपर्यंतचा प्रतीक्षा कालावधी टाळायचा असल्यास ॲडमिन तुमच्यासोबत ग्रुप आमंत्रण लिंक शेअर करू शकतो.
टीप: तुम्ही प्रत्येक वेळी ग्रुपमधून बाहेर पडता तेव्हा, ग्रुप ॲडमिनला तुम्हाला ग्रुपमध्ये पुन्हा सामील करून घेण्यासाठी लागणारा वेळ तितक्याच पटीत वाढत जातो. प्रतीक्षा कालावधी कमाल ८१ दिवसांचा असू शकतो.
हे मदतीचे होते का?
होय
नाही