Firefox वर नोटिफिकेशन्स न मिळणे
वेब आणि डेस्कटॉप
तुम्हाला WhatsApp वेबवर नोटिफिकेशन्स मिळत नसतील, तर तुमच्या ब्राउझरमध्ये नोटिफिकेशन्स सुरू आहेत याची खात्री करा.
नोटिफिकेशन्स सुरू करणे
- तुमच्या ब्राउझरमध्ये, तुमच्या चॅट्सच्या यादीच्या वर असलेल्या निळ्या बॅनरमधील डेस्कटॉप नोटिफिकेशन्स सुरू करा यावर क्लिक करा.
- त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांचे पालन करा.
टीप: निळे बॅनर दिसत नसल्यास पेज रिफ्रेश करा. तुम्हाला अजूनही बॅनर दिसत नसेल, तर तुम्ही तुमच्या WhatsApp सेटिंग्ज मध्ये नोटिफिकेशन्स म्यूट किंवा बंद केली असल्याची शक्यता आहे.
नोटिफिकेशन्स अनब्लॉक करणे
- तुमच्या ब्राउझरमध्ये, मेनू आयकॉनवर क्लिक करा, त्यानंतर > पर्याय किंवा प्राधान्ये वर क्लिक करा.
- गोपनीयता आणि सुरक्षा वर क्लिक करा.
- परवानग्या अंतर्गत, नोटिफिकेशन्स च्या बाजूच्या सेटिंग्ज… वर क्लिक करा.
- “web.whatsapp.com” च्या बाजूचा ड्रॉपडाउन ब्लॉक करा वर सेट केलेला असेल, तर तो बदलून परवानगी द्या वर सेट करा.
- बदल सेव्ह करा वर क्लिक करा.
तुम्ही "https://web.whatsapp.com/" च्या बाजूच्या कुलूप चिन्हावर क्लिक करूनही हे करू शकता. नोटिफिकेशन्स पाठवा हे ब्लॉक केलेले असे दिसत असल्यास, "x" वर क्लिक करा आणि पेज रिफ्रेश करा.
संबंधित लेख:
- WhatsApp वेब किंवा डेस्कटॉपवर नोटिफिकेशन्स कशी बदलावीत
- पुढील प्लॅटफॉर्म्सवर नोटिफिकेशन्स न मिळणे: Chrome | Microsoft Edge | Opera | Safari