स्पॅम आणि अनावश्यक मेसेजेसविषयी माहिती

आमच्या सिस्टीममार्फत येणाऱ्या स्पॅम मेसेजेसचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याला आम्ही सर्वात जास्त प्राधान्य देतो आणि WhatsApp वर पाठवले जाणारे अनावश्यक मेसेजेस कमी करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. परंतु, जसे नेहमीचे एसएमएस किंवा फोन कॉल्स यांच्याबाबतीत होते तसेच ज्या WhatsApp वापरकर्त्यांकडे कडे तुमचा फोन नंबर आहे ते तुमच्याशी संपर्क साधू शकतात. आम्ही तुम्हाला अशाप्रकारचे मेसेजेस ओळखण्यात आणि हाताळण्यात मदत करू इच्छितो.
अनावश्यक मेसेजेस तुमच्या ओळखीच्या संपर्कांकडूनच येतील असे नाही. अशा प्रकारचे मेसेजेस चुकीच्या माहितीचा प्रसार करू शकतात आणि तुम्हाला चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्यास भाग पाडू शकतात.
अनावश्यक मेसेजेस कसे दिसतात
तुम्हाला मिळालेला मेसेज संशयास्पद आहे किंवा तो पाठवणारा संपर्क कोणीतरी वेगळीच व्यक्ती असल्याचे भासवतो आहे, हे सूचित करणारे काही संकेत आहेत. खालील गोष्टी असणाऱ्या मेसेजेसकडे लक्ष ठेवा, कारण या गोष्टी मेसेजमधील असतील तर तो मेसेज पाठवणारा संपर्क विश्वास ठेवण्यायोग्य नाही असे सूचित करू शकतात:
  • चुकीची स्पेलिंग्ज किंवा व्याकरणाच्या चुका
  • तुम्हाला लिंकवर टॅप करण्यास किंवा लिंकद्वारे नवीन फीचर्स सक्रिय करण्यास सांगणे
  • क्रेडिट कार्ड माहिती, बँक खाते नंबर, वाढदिवसाची तारीख, पासवर्ड्स यांसारखी तुमची खाजगी माहिती शेअर करायला सांगणे
  • तुम्हाला मेसेज फॉरवर्ड करायला सांगणे
  • तुम्हाला WhatsApp वापरण्याकरिता पैसे द्यावे लागतील असा दावा करणे
आम्ही येथे याची आठवण करून देऊ इच्छितो, की WhatsApp हे ॲप मोफत आहे आणि तुम्हाला ते वापरण्याकरिता पैसे द्यावे लागत नाहीत.
अनावश्यक मेसेजेसचे काय करावे
तुम्ही एखाद्या मेसेजबद्दल साशंक असाल किंवा एखादा मेसेज भलताच प्रलोभनीय वाटत असेल, पण तो खरा आहे का याबद्दल शंका वाटत असेल, तर अशा मेसेजवर टॅप करू नका. तो शेअर किंवा फॉरवर्डदेखील करू नका. तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज प्राप्त होतो, तेव्हा त्याची तक्रार नोंदवावी, तो मेसेज पाठवणाऱ्या संपर्काला ब्लॉक करावे आणि मेसेज डिलीट करावा, असे आम्ही सुचवतो. संपर्कांना ब्लॉक कसे करावे आणि त्यांची तक्रार कशी नोंदवावी याविषयी येथे जाणून घ्या. मेसेज संशयास्पद असल्याचे जाणवत आहे हे तुम्ही पाठवणाऱ्या संपर्कालाही सांगू शकता आणि त्यांना WhatsApp चा जबाबदारीने वापर कसा करावा हे समजावून सांगू शकता.
सर्वोत्तम पद्धत म्हणजे, एखादी गोष्ट खरी असल्याची तुम्हाला खात्री नसेल किंवा तुम्हाला आलेला मेसेज कोणी लिहिला हे तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही तो मेसेज फॉरवर्ड करू नये. चुकीच्या माहितीचा प्रसार कसा रोखावा याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही