तुमचे खाते WhatsApp Messenger आणि WhatsApp Business या ॲप्सदरम्यान हलवण्याविषयी माहिती

WhatsApp Messenger आणि WhatsApp Business ॲप ही दोन वेगवेगळी ॲप्स आहेत. तुम्ही एकाच फोन नंबरने ही दोन्ही ॲप्स एकाचवेळी वापरू शकत नाही. असे असले तरी, तुम्ही तुमचे खाते एका ॲपवरून दुसऱ्या ॲपवर हलवू शकता.
तुमच्या खात्याची माहिती WhatsApp Messenger वरून WhatsApp Business ॲपवर हलवणे एकदम सोपे आहे. Android आणि iPhone या प्लॅटफॉर्म्सवर तुमचे खाते WhatsApp Messenger वरून WhatsApp Business ॲपवर कसे हलवावे हे जाणून घ्या.
तुमचे खाते WhatsApp Business ॲपवरून WhatsApp Messenger वर हलवणे शक्य आहे. Android आणि iPhone या प्लॅटफॉर्म्सवर तुमचे खाते WhatsApp Business ॲपवरून WhatsApp Messenger वर कसे हलवावे हे जाणून घ्या.
टीप: तुमच्या खात्याची काही माहिती WhatsApp Business ॲपवरून WhatsApp Messenger वर हलवणे शक्य असले, तरी WhatsApp Business ॲपची फीचर्स WhatsApp Messenger वर हलवता येणार नाहीत. याचाच अर्थ, कॅटलॉग प्रॉडक्ट्स आणि कलेक्शन्स यांसारख्या फक्त WhatsApp Business ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सशी संबंधित खाते माहिती ट्रान्सफर केली जाऊ शकत नाही.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही