फोटो आणि व्हिडिओ कसे संपादित करावेत

WhatsApp मध्ये स्टिकर्स, इमोजी, मजकूर, फ्रीहॅंड ड्रॉइंग तसेच फिल्टर्स टाकून तुमचे फोटो व व्हिडिओ पर्सनलाइझ करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
टीप: ही फीचर्स फक्त iOS 12 आणि त्यानंतरच्या आवृत्त्यांवर उपलब्ध आहेत.
फोटो आणि व्हिडिओ संपादित करणे
  1. मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या चौकटीच्या बाजूच्या अटॅच करा
    वर टॅप करा.
  2. नवीन फोटो घ्या किंवा व्हिडिओ बनवा अथवा कॅमेरा रोलमध्ये आधीपासून असलेला फोटो किंवा व्हिडिओ निवडा.
  3. तुमच्या फोटोचे किंवा व्हिडिओचे संपादन सुरू करा.
इमोजी किंवा स्टिकर जोडा
  1. इमोजी
    > स्टिकर किंवा इमोजी वर टॅप करा
  2. जे वापरायचे आहे ते निवडून त्यावर टॅप करा.
    • इमोजी किंवा स्टिकर हलवण्यासाठी त्यावर टॅप करून होल्ड करून ठेवा व नंतर ड्रॅग करा.
    • इमोजी किंवा स्टिकरचा आकार बदलण्यासाठी दोन्ही बोटे बाहेरून आत (पिंच इन) अथवा दोन्ही बोटे आतून बाहेर (पिंच आउट) केल्यास इमोजी किंवा स्टिकरचा आकार लहान अथवा मोठा करता येईल.
    • इमोजी किंवा स्टिकर फिरवण्यासाठी, त्यावर पिंच करा आणि ते फिरवा.
मजकूर जोडणे
  1. स्क्रीनच्या सर्वात वर असलेल्या मजकूर
    वर टॅप करा.
  2. मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या चौकटीमध्ये तुम्हाला हवा असलेला मजकूर टाइप करा.
    • रंग निवडण्यासाठी असलेल्या साधनावर तुमचे बोट वर-खाली स्लाइड करून तुम्हाला हवा असलेला रंग निवडा.
    • फॉण्ट प्रकार निवडण्यासाठी, मजकूर
      वर टॅप करा. फॉण्ट प्रकार ठरवून झाल्यावर तुमचे बोट उचला.
    • मजकुराचा आकार बदलण्यासाठी दोन्ही बोटे बाहेरून आत (पिंच इन) अथवा दोन्ही बोटे आतून बाहेर (पिंच आउट) केल्यास मजकुरातील अक्षरांचा आकार लहान अथवा मोठा करता येईल.
    • मजकूर फिरवण्यासाठी त्याच्यावर पिंच करा आणि फिरवा.
ड्रॉ करणे
  1. ड्रॉ करा
    वर टॅप करा.
  2. फ्रीहॅंड ड्रॉइंगसाठी तुमच्या बोटाचा वापर करा.
    • रंग निवडण्यासाठी असलेल्या साधनावर तुमचे बोट वर-खाली स्लाइड करून तुम्हाला हवा असलेला रंग निवडा. तुम्ही ड्रॉ करत असलेल्या प्रत्येक ओळीसाठी तुम्ही रंग निवडू शकता.
फिल्टर लागू करणे
  1. फोटो किंवा व्हिडिओ वर वरच्या दिशेने स्वाइप करा.
  2. फिल्टर निवडा.
संपादने हटवणे आणि पाठवणे
स्टिकर्स, इमोजी किंवा मजकूर हटवण्यासाठी त्यांना स्क्रीनच्या वरील बाजूस असलेल्या कचरापेटी चिन्हावर ड्रॅग करा आणि सोडा. ड्रॉइंग्ज हटवण्यासाठी,
पूर्ववत करा वर टॅप करा.
मीडिया फाइलचे संपादन पूर्ण झाल्यावर,
पाठवा वर टॅप करा.
संबंधित लेख:
iPhone वर मीडिया फाइल्स कशा पाठवाव्यात
हे मदतीचे होते का?
होय
नाही