WhatsApp वर स्टिकर्स कशी तयार करावीत

तुम्हाला ॲप डेव्हलपिंगचा किंवा कोडिंगचा जास्त अनुभव नसूनही तुमचे स्वत:चे स्टिकर आर्ट सबमिट करून ॲप तयार करण्यात मदत व्हावी म्हणून आम्ही Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर नमुना ॲप्स आणि कोड देऊ करतो. ज्यांना ॲप डेव्हलपिंगचा अनुभव आहे ते डेव्हलपर्स WhatsApp चा सपोर्ट असलेल्या APIs आणि इंटरफेसचा वापर करून आणखी ॲडव्हान्स्ड स्टिकर ॲप्सदेखील तयार करू शकतात.
स्टिकर्स डिझाइन करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यकता वाचा आणि तुम्हाला तुमचे स्टिकर ॲप तयार करायचे असेल तर लागणाऱ्या गोष्टी आणि टिपा जाणून घेण्यासाठी नमुना ॲप्स शी संबंधित README फाइल्स वाचा.
टीप: iOS स्टिकर ॲप तयार करताना Apple ॲप स्टोअर पुनरावलोकन मार्गदर्शकतत्त्वांचे पालन व्हावे यासाठी एक युनिक यूझर इंटरफेस (UI) डेव्हलप करा, नमुना ॲप्सचा UI वापरू नका.
कस्टम स्टिकर्सनी खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
  • प्रत्येक स्टिकरचे बॅकग्राउंड पारदर्शक असावे.
  • स्टिकरचा आकार 512x512 पिक्सेल्स इतकाच असावा.
  • प्रत्येक स्टिकरचा आकार 100 KB पेक्षा कमी असावा.
WhatsApp स्टिकर पिकर किंवा ट्रेमध्ये तुमच्या स्टिकर पॅकसाठी एक खास आयकॉन असावा. आयकॉनसाठी दिलेल्या इमेजचा आकार 96x96 पिक्सेल्स इतका, 50KB पेक्षा कमी असावा.
याशिवाय, आम्ही आणखी काही गोष्टी सुचवतो:
  • स्टिकर्स पांढऱ्या, काळ्या, रंगीत किंवा पॅटर्न्स असलेल्या वेगवेगळ्या बॅकग्राउंडवर प्रस्तुत केली जातील. प्रत्येक स्टिकरच्या बाहेरच्या बाजूला 8 पिक्सेलचा #FFFFFF स्ट्रोक टाकावा असे आम्ही सुचवतो. नमुना Photoshop (PSD) फाइल येथे पहा.
  • स्टिकरची इमेज आणि 512x512 पिक्सेल्सच्या कॅन्व्हासची किनार यांमध्ये 16 पिक्सेल्सचे मार्जिन असावे.
स्टिकर्स तयार करण्याविषयी कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला developers@support.whatsapp.com यावर ईमेल करा. इतर कोणतेही प्रश्न आणि समस्या असल्यास WhatsApp वर सेटिंग्ज > मदत > आमच्याशी संपर्क साधा येथे जा.
स्टिकर्स ही Android आणि iOS वर WhatsApp च्या नवीन आवृत्तीवर उपलब्ध आहेत. तुमच्या WhatsApp वर स्टिकर्स दिसत नसतील तर फोनच्या ॲप स्टोअरमध्ये जाऊन WhatsApp नवीन आवृत्तीवर अपडेट करा.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही