कॅटलॉग किंवा बिझनेसची तक्रार कशी नोंदवावी

Android
iPhone
वेब आणि डेस्कटॉप
एखादा बिझनेस कॉमर्स पॉलिसीचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्या बिझनेसची तक्रार करू शकता.
प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची तक्रार नोंदवणे
 1. तुमचे बिझनेससोबतचे चॅट उघडा.
 2. बिझनेसच्या नावावर टॅप करा.
 3. प्रॉडक्ट्सच्या शेजारी असलेल्या सर्व पहा वर टॅप करा.
 4. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर टॅप करा.
 5. अधिक पर्याय
  > तक्रार करा यावर टॅप करा.
 6. तुमच्याकडे दोन पर्याय असतील:
  • प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची तक्रार करण्यासाठी, तक्रार करा वर टॅप करा.
  • अधिक तपशील पुरवण्यासाठी, आम्हाला आणखी माहिती द्या वर टॅप करा. त्यानंतर हवा असलेला पर्याय निवडून सबमिट करा वर टॅप करा.
बिझनेसची तक्रार नोंदवणे
 1. बिझनेसच्या WhatsApp Business प्रोफाइलवर जा आणि तळापर्यंत स्क्रोल करा.
 2. बिझनेसची तक्रार करा वर टॅप करा.
 3. तुमच्याकडे दोन पर्याय असतील:
  • बिझनेस ब्लॉक करून त्याची तक्रार करण्यासाठी, बिझनेस ब्लॉक करा आणि चॅट हटवा याशेजारी असलेल्या चेक बॉक्सवर टॉप करा. त्यानंतर, तक्रार करा वर टॅप करा.
  • बिझनेसची तक्रार करण्यासाठी, तक्रार करा वर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही