तुमचे प्रोफाइल कसे संपादित करावे

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही WhatsApp सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचा प्रोफाइल फोटो, तुमचे नाव आणि तुमची माहिती संपादित करू शकता.
तुमच्या प्रोफाइल फोटोमध्ये बदल करणे
  1. WhatsApp सेटिंग्ज वर जा.
  2. तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  3. त्यानंतर हे करा:
    • सध्या प्रोफाइल फोटो लावलेला नसल्यास फोटो जोडा वर टॅप करा. तुम्ही फोटो घेऊ शकता किंवा आधीच असलेल्या फोटोंमधून फोटो निवडू शकता.
    • सध्या प्रोफाइल फोटो लावलेला असल्यास आणि त्यात बदल करायचे असल्यास संपादित करा > संपादन यावर टॅप करा. तुम्ही फोटो हटवणे, फोटो घेणे किंवा फोटो निवडणे यांपैकी एक पर्याय वापरू शकता.
तुमच्या प्रोफाइल नावात बदल करणे
  1. WhatsApp सेटिंग्ज वर जा.
  2. तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा आणि त्यानंतर तुमच्या नावावर टॅप करा.
  3. तुमचे नवीन नाव एंटर करा.
    • तुमच्या नावामध्ये कमाल २५ कॅरॅक्टर्स असू शकतात.
    • नावामध्ये इमोजी टाकण्यासाठी इमोजी
      वर टॅप करा.
  4. पूर्ण झाले वर टॅप करा.
ग्रुप्समधील ज्या वापरकर्त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये तुमचा संपर्क आणि संपर्क माहिती समाविष्ट नाही, त्यांना तुमचे हे प्रोफाइल नाव दिसेल.
'माझ्याबद्दल' मध्ये बदल करणे
  1. WhatsApp सेटिंग्ज वर जा.
  2. तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  3. माझ्याबद्दल या फील्डवर टॅप करा.
  4. त्यानंतर तुम्ही हे करू शकता:
    • आधीपासून उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडा.
    • सध्या यावर सेट केले आहे वर टॅप करा आणि तुमची सध्याची माहिती बदला. 'माझ्याबद्दल' मध्ये लिहिलेल्या मजकुरात कमाल १३९ कॅरॅक्टर्स असू शकतात.
टीप:
  • 'माझ्याबद्दल' हे फील्ड रिकामे ठेवता येणार नाही.
  • तुमचा प्रोफाइल फोटो आणि 'माझ्याबद्दल' कोण पाहू शकते हे तुम्ही तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमधून नियंत्रित करू शकता.
  • तुम्ही एखाद्या संपर्कास ब्लॉक केले असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या प्रोफाइल फोटोमध्ये किंवा 'माझ्याबद्दल' मध्ये केलेले बदल दिसणार नाहीत.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही