डार्क मोड कसा वापरावा याविषयी माहिती

डार्क मोड वापरून तुम्ही WhatsApp ची पांढरी थीम बदलून काळी करू शकता. हे तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जमधून किंवा कंट्रोल सेंटरमधून करता येते. हे फीचर iOS 13 आणि पुढील आवृत्त्यांवर उपलब्ध आहे.
डिव्हाइस सेटिंग्जमधून डार्क मोड सुरू करणे
 1. iPhone Settings > Display & Brightness यावर जा.
 2. APPEARANCE अंतर्गत खालील पर्याय निवडा:
  • डार्क: हा पर्याय निवडल्याने डार्क मोड सुरू होतो.
  • लाइट: हा पर्याय निवडल्याने डार्क मोड बंद होतो.
  • ऑटोमॅटिक: डार्क मोड एखाद्या विशिष्ट वेळेस आपोआप सुरू होतो. पर्याय वर टॅप करा, त्यानंतर सूर्यास्त ते सूर्योदय निवडा किंवा कस्टम शेड्यूल सेट करा.
कंट्रोल सेंटरमधून डार्क मोड सुरू करणे
 1. iPhone Settings > Control Center यावर जा.
 2. कंट्रोल्स समाविष्ट करा अंतर्गत डार्क मोड जोडा. असे केल्याने तो कंट्रोल सेंटरमध्ये दिसायला लागेल.
 3. कंट्रोल सेंटर उघडा:
  • iPhone X किंवा त्याहून नवीन आवृत्तीवर, स्क्रीनच्या सर्वात वर उजव्या बाजूने खाली स्वाइप करा.
  • iPhone 8 किंवा त्याहून जुन्या आवृत्तीवर, स्क्रीनच्या तळापासून वरच्या बाजूला स्वाइप करा.
 4. डार्क मोड सुरू किंवा बंद करण्यासाठी डार्क मोड चिन्हावर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?