तुमची गोपनीयता सेटिंग्ज कशी बदलावीत

WhatsApp वर तुमची गोपनीयता सेटिंग्ज बाय डीफॉल्ट खालील गोष्टींना अनुमती देतात:
 • कोणत्याही वापरकर्त्याला तुमचे 'अखेरचे पाहिलेले' आणि 'ऑनलाइन', प्रोफाइल फोटो, 'माझ्याबद्दल' आणि वाचल्याची पोचपावती पाहता येणे
 • तुमच्या संपर्कांना तुमची स्टेटस अपडेट्स पाहता येणे
 • कोणत्याही वापरकर्त्यांना तुम्हाला ग्रुप्समध्ये जोडता येणे
गोपनीयता सेटिंग्ज बदलणे
 1. यावर:
  • Android: अधिक पर्याय
   > सेटिंग्ज > गोपनीयता यावर टॅप करा.
  • iPhone: सेटिंग्ज > गोपनीयता यावर टॅप करा.
  • KaiOS: पर्याय > सेटिंग्ज > खाते > गोपनीयता यावर प्रेस करा.
  • डेस्कटॉप: मेनू
   > सेटिंग्ज > गोपनीयता यावर क्लिक करा.
 2. पुढील गोष्टी कोण करू शकते हे तुम्ही बदलू शकता:
  • तुमचे 'अखेरचे पाहिलेले' आणि 'ऑनलाइन' पाहणे
  • तुमचा प्रोफाइल फोटो पाहणे
  • तुमची 'माझ्याबद्दल' माहिती पाहणे
  • तुमची स्टेटस अपडेट्स पाहणे
  • तुमची वाचल्याची पोचपावती पाहणे
  • तुम्हाला ग्रुप्समध्ये जोडणे
टीप:
 • तुम्ही तुमचे 'अखेरचे पाहिलेले' किंवा 'ऑनलाइन' शेअर केले नसेल, तर तुम्ही इतर वापरकर्त्यांचे 'अखेरचे पाहिलेले' किंवा 'ऑनलाइन' पाहू शकणार नाही.
 • तुम्ही 'वाचल्याची पोचपावती' बंद केली, तर तुम्ही इतर लोकांची वाचल्याची पोचपावती पाहू शकणार नाही. ग्रुप चॅट्ससाठी 'वाचल्याची पोचपावती' नेहमीच पाठवली जाते.
 • संपर्काने ‘वाचल्याची पोचपावती’ बंद केली असल्यास, त्यांनी तुमची स्टेटस अपडेट्स बघितली का हे तुम्ही पाहू शकणार नाही.
 • तुमच्यासोबत चॅट थ्रेडवर ऑनलाइन असणारे लोक तुम्ही टाइप करत आहात हे पाहू शकतील.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही