तुमची गोपनीयता सेटिंग्ज कशी बदलावीत

WhatsApp वर तुमची गोपनीयता सेटिंग्ज बाय डीफॉल्ट खालील गोष्टींना अनुमती देतात:
  • कोणत्याही वापरकर्त्याला तुमचा प्रोफाइल फोटो, 'माझ्याबद्दल' आणि वाचल्याची पोचपावती पाहता येणे
  • तुमच्या संपर्कांना तुमची स्टेटस अपडेट्स पाहता येणे
  • कोणत्याही वापरकर्त्यांना तुम्हाला ग्रुप्समध्ये जोडता येणे
टीप: तुम्ही संपर्क म्हणून सेव्ह केलेले वापरकर्ते किंवा तुम्ही ज्यांना आधी मेसेज केला आहे अशा व्यक्ती तुमचे 'अखेरचे पाहिलेले' आणि 'ऑनलाइन' पाहू शकतात.
गोपनीयता सेटिंग्ज बदलणे
  1. पुढील प्लॅटफॉर्म्सवर:
    • Android: अधिक पर्याय
      > सेटिंग्ज > खाते > गोपनीयता यावर टॅप करा.
    • iPhone: सेटिंग्ज > गोपनीयता यावर टॅप करा.
    • KaiOS: पर्याय > सेटिंग्ज > खाते > गोपनीयता यावर प्रेस करा.
    • डेस्कटॉप: मेनू
      > सेटिंग्ज > गोपनीयता यावर क्लिक करा.
  2. पुढील गोष्टी कोण करू शकते हे तुम्ही बदलू शकता:
    • तुमचे अखेरचे पाहिलेले आणि ऑनलाइन पाहणे
    • तुमचा प्रोफाइल फोटो पाहणे
    • तुमचे 'माझ्याबद्दल' पाहणे
    • तुमची स्टेटस अपडेट्स पाहणे
    • वाचल्याची पोचपावती पाहणे
    • तुम्हाला ग्रुप्समध्ये जोडणे
टीप:
  • तुम्ही तुमचे 'अखेरचे पाहिलेले' किंवा 'ऑनलाइन' शेअर केले नसेल, तर तुम्ही इतर वापरकर्त्यांचे 'अखेरचे पाहिलेले' किंवा 'ऑनलाइन' पाहू शकणार नाही.
  • तुम्ही 'वाचल्याची पोचपावती' बंद केली, तर तुम्ही इतर लोकांची वाचल्याची पोचपावती पाहू शकणार नाही. ग्रुप चॅट्ससाठी 'वाचल्याची पोचपावती' नेहमीच पाठवली जाते.
  • संपर्काने ‘वाचल्याची पोचपावती’ बंद केली असल्यास, त्यांनी तुमची स्टेटस अपडेट्स बघितली का हे तुम्ही पाहू शकणार नाही.
  • तुमच्यासोबत चॅट थ्रेडवर ऑनलाइन असणारे लोक तुम्ही टाइप करत आहात हे पाहू शकतात.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही