तुमची गोपनीयता सेटिंग्ज कशी बदलावीत

WhatsApp मधील गोपनीयता सेटिंग्ज बाय डीफॉल्ट खालील गोष्टींना परवानगी देतात:
 • कोणत्याही वापरकर्त्याला तुमचे 'अखेरचे पाहिलेले', प्रोफाइल फोटो, तुमची माहिती आणि वाचल्याची पोचपावती हे सर्व पाहता येते
 • तुमच्या संपर्कांना तुमचे स्टेटस अपडेट पाहता येते
 • कोणत्याही वापरकर्त्याला तुम्हाला ग्रुपमध्ये सामील करून घेता येते
गोपनीयता सेटिंग्ज बदलणे
 1. सुरू करण्यासाठी:
  • Android: अधिक पर्याय
   > सेटिंग्ज > खाते > गोपनीयता यावर टॅप करा.
  • iPhone: Settings > Account > Privacy यावर टॅप करा.
  • KaiOS: पर्याय > सेटिंग्ज > खाते > गोपनीयता यावर प्रेस करा.
 2. तुम्ही हे बदलू शकता. कोण:
  • तुमचे अखेरचे पाहिलेले पाहू शकेल
  • तुमचा प्रोफाइल फोटो पाहू शकेल
  • तुमची स्वत:बद्दलची माहिती पाहू शकेल
  • तुमचे स्टेटस अपडेट पाहू शकेल
  • वाचल्याची पोचपावती पाहू शकेल
  • तुम्हाला ग्रुप्स मध्ये समाविष्ट करून घेऊ शकेल
टीप:
 • तुम्ही तुमचे 'अखेरचे पाहिलेले' शेअर केले नसेल, तर तुम्ही इतरांचे 'अखेरचे पाहिलेले' पाहू शकत नाही.
 • तुम्ही 'वाचल्याची पोचपावती' हे फीचर बंद केले, तर तुम्ही इतरांनी वाचल्याची पोचपावतीदेखील पाहू शकणार नाही. ग्रुप चॅटमध्ये वाचल्याची पोचपावती नेहमीच दिसते, ती बंद करता येत नाही.
 • संपर्काने 'वाचल्याची पोचपावती' हे फीचर बंद ठेवले असल्यास, तुमचे स्टेटस अपडेट कोणी पाहिले हे तुम्ही पाहू शकणार नाही.
 • तुम्ही ऑनलाइन आहात किंवा तुमचे लिहीत आहे... हे स्टेटस दिसणार नाही अशा पद्धतीचा बदल करण्याची कोणतीही सोय नाही.
हे मदतीचे होते का?
होय
नाही