मेसेजेस फॉरवर्ड कसे करावेत

‘फॉरवर्ड करणे’ हे फीचर वापरून तुम्ही वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमधून इतर व्यक्तींना किंवा ग्रुप्सना मेसेजेस फॉरवर्ड करू शकता. फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसवर “फॉरवर्ड केलेले” असे लेबल असते. या लेबलमुळे पाठवणाऱ्या व्यक्तीने तो मेसेज स्वत: लिहीला आहे की दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीकडून आलेला मेसेज तुम्हाला पाठवला आहे, हे तुम्हाला समजते.
तुम्ही एखादा मेसेज एका वेळी कमाल पाच चॅट्सना फॉरवर्ड करू शकता. एखादा मेसेज आधीच फॉरवर्ड केला गेला असेल, तर तुम्ही तो कमाल एका ग्रुप चॅटला आणि कमाल पाच चॅट्सना फॉरवर्ड करू शकता. एखादा मेसेज अनेक वेळा फॉरवर्ड केला गेला असेल, तर तो एकावेळी फक्त एका चॅटला फॉरवर्ड करता येतो.

मेसेज फॉरवर्ड करणे
  1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमधील एखादा मेसेज फॉरवर्ड करायचा असल्यास, त्या मेसेजवर टॅप करून धरून ठेवा.
    • एकापेक्षा अधिक मेसेजेस फॉरवर्ड करायचे असल्यास पहिला मेसेज निवडल्यानंतर आणखी मेसेजेस निवडता येतात.
  2. फॉरवर्ड करा
    वर टॅप करा.
  3. तुम्हाला ज्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटला मेसेजेस फॉरवर्ड करायचे आहेत ते चॅट शोधा किंवा निवडा.
  4. पाठवा
    वर टॅप करा.
टीप:
  • तुम्ही मीडिया फाइल्स, लोकेशन्स किंवा संपर्कदेखील फॉरवर्ड करू शकता. ते पुन्हा अपलोड करण्याची गरज नाही.
  • तुम्ही फॉरवर्ड करत आहात ते मेसेजेस तुमचे स्वत:चे नसतील, तर तुम्हाला आणि तो मेसेज पाठवता आहात त्या व्यक्तीला त्या मेसेजवर "फॉरवर्ड केलेले" असे लेबल दिसेल.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही