व्हिडिओ कॉल कसा करावा

Android
iPhone
वेब आणि डेस्कटॉप
Windows
व्हिडिओ कॉलिंगचा वापर करून तुम्ही तुमच्या संपर्कांना WhatsApp मधून व्हिडिओ कॉल करू शकता.
व्हिडिओ कॉल करणे
  1. ज्या संपर्काला व्हिडिओ कॉल करायचा आहे त्याच्यासोबत वैयक्तिक चॅट सुरू करा.
  2. व्हिडिओ कॉल
    वर टॅप करा.
किंवा WhatsApp उघडा, त्यानंतर कॉल्स टॅब > नवीन कॉल
वर टॅप करा. तुम्हाला ज्या संपर्काला व्हिडिओ कॉल करायचा आहे तो संपर्क शोधा, त्यानंतर व्हिडिओ कॉल
वर टॅप करा.
आलेला व्हिडिओ कॉल घेणे
तुम्हाला कोणीतरी व्हिडिओ कॉल करते तेव्हा तुमचा फोन लॉक असेल, तर तुम्हाला इनकमिंग व्हिडिओ कॉल असे WhatsApp चे नोटिफिकेशन दिसते. त्यानंतर तुम्ही खालीलपैकी एक करू शकता:
  • नोटिफिकेशन डाव्या बाजूला स्लाइड करा आणि त्यानंतर, पहा > स्वीकार करा वर टॅप करा.
    • किंवा, तुम्ही नोटिफिकेशन उजव्या बाजूला स्लाइड करूनही कॉल घेऊ शकता.
  • नोटिफिकेशन डाव्या बाजूला स्लाइड करा आणि त्यानंतर, पहा > नकार द्या वर टॅप करा.
  • नोटिफिकेशन डाव्या बाजूला स्लाइड करा आणि एक संक्षिप्त मेसेज पाठवून कॉल नाकारण्यासाठी पहा > मेसेज करा वर टॅप करा.
तुम्हाला कोणीतरी व्हिडिओ कॉल करते तेव्हा तुमचा फोन अनलॉक असेल, पण तुम्ही WhatsApp वर नसाल, तर तुम्हाला इनकमिंग व्हिडिओ कॉल असे WhatsApp चे नोटिफिकेशन दिसते. त्यानंतर तुम्ही खालीलपैकी एक करू शकता:
  • नोटिफिकेशन खाली ओढा आणि त्यानंतर स्वीकार करा वर टॅप करा किंवा कॉल घेण्यासाठी नोटिफिकेशनवर टॅप करा.
  • नोटिफिकेशन खाली ओढा आणि नकार द्या वर टॅप करा.
  • नोटिफिकेशन खाली ओढा आणि संक्षिप्त मेसेज पाठवून कॉल नाकारण्यासाठी मेसेज करा वर टॅप करा.
तुम्हाला कोणीतरी व्हिडिओ कॉल करते तेव्हा तुमचा फोन अनलॉक असेल आणि तुम्ही WhatsApp वर देखील असाल, तर तुम्हाला इनकमिंग WhatsApp व्हिडिओ कॉल स्क्रीन दिसते. त्यानंतर तुम्ही खालीलपैकी एकावर टॅप करू शकता:
  • स्वीकार करा
  • नकार द्या
  • Remind Me वर टॅप करून तुम्हाला कधी आठवण करून द्यायची याची, When I leave किंवा In 1 hour यामधून निवड करू शकता.
  • तात्काळ मेसेज पाठवून कॉल नाकारण्यासाठी मेसेज करा.
व्हिडिओ कॉलमधून व्हॉइस कॉलला स्विच करणे
  1. व्हिडिओ कॉल चालू असताना, व्हिडिओ बंद करा
    वर टॅप करा, ज्यामुळे तुम्ही व्हिडिओ कॉल करत असलेल्या व्यक्तीला सूचित केले जाईल.
  2. दुसरी व्यक्तीदेखील त्यांचा व्हिडिओ बंद करते, तेव्हा तो कॉल आपोआपच व्हॉइस कॉलला स्विच होतो.
व्हॉइस कॉलमधून व्हिडिओ कॉलला स्विच करणे
  1. व्हॉइस कॉल चालू असताना, व्हिडिओ कॉल > स्विच करा वर टॅप करा.
  2. ज्या व्यक्तीसोबत तुमचा व्हॉइस कॉल सुरू आहे, त्या व्यक्तीला तो कॉल व्हिडिओ कॉलवर स्विच करण्याची विनंती दिसेल. त्यानंतर ती व्यक्ती ती स्विच विनंती स्वीकारू किंवा नाकारू शकते.
टीप: ग्रुप व्हिडिओ कॉल्स करत असताना किंवा आलेले ग्रुप व्हिडिओ कॉल्स घेत असताना तुमच्याकडे आणि तुमच्या संपर्कांकडे उत्तम इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करा. एखाद्या संपर्काकडील कनेक्शन खराब असेल, तर त्यानुसार व्हिडिओ कॉलची गुणवत्तादेखील बदलेल.
संबंधित लेख:
  • पुढील प्लॅटफॉर्म्सवर ग्रुप व्हिडिओ कॉल कसा करावा: Android | iPhone
  • Android वर व्हिडिओ कॉल कसा करावा
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही