तात्पुरता बॅन केलेल्या खात्यांविषयी माहिती

तुम्हाला ॲपमध्ये "तुमचे खाते तात्पुरता बॅन करण्यात आले आहे" असा मेसेज मिळाला, तर त्याचा अर्थ तुम्ही WhatsApp ची अनधिकृत आवृत्ती वापरत आहात असा असू शकतो किंवा तुमच्यावर माहिती काढून घेण्याचा, म्हणजेच तुम्ही स्क्रॅपिंग करत असल्याचा संशय असू शकतो. तात्पुरता बॅन झाल्यानंतर तुम्ही अधिकृत ॲपवर स्विच न केल्यास किंवा स्क्रॅपिंग न थांबवल्यास, तुमचे खाते WhatsApp वापरण्यापासून कायमचे बॅन केले जाऊ शकते.
अनधिकृत WhatsApp ॲप्स
अनधिकृत WhatsApp ॲप्लिकेशन्स तुमची सुरक्षा धोक्यात आणतात आणि आम्ही त्यांना सपोर्ट करत नाही.
तुम्ही ती ॲप्स वापरल्यास, पुढील गोष्टी होऊ शकतात:
  • तुमचे मेसेजेस किंवा तुमचे लोकेशन अथवा तुम्ही शेअर करत असलेल्या फाइल्स यांसारखा तुमचा डेटा खाजगी आणि सुरक्षित असेलच याची कोणतीही हमी नाही.
  • अनधिकृत WhatsApp ॲप्स वापरणे आमच्या सेवाशर्तींच्या विरुद्ध असल्यामुळे तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते.
तुमच्याकडे WhatsApp चा ॲक्सेस असल्याची खात्री करण्यासाठी, आमच्या अधिकृत ॲपवर तुमचा नंबर पुन्हा कन्फर्म करा. आमचे अधिकृत ॲप तुम्ही आमच्या या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता: www.whatsapp.com/download.
स्क्रॅपिंग
स्क्रॅपिंग म्हणजे परवानगी नसलेल्या कोणत्याही उद्देशांसाठी ऑटोमेटेड पद्धतीने लक्ष्यित आणि मोठ्या प्रमाणावर माहिती काढून घेणे. वापरकर्त्यांकडून अशा पद्धतीने फोन नंबर, वापरकर्त्यांचे प्रोफाइल फोटो आणि WhatsApp वरील स्टेटस यांसारखी इतर माहिती काढून घेण्याने आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन होते.
संबंधित लेख:
  • तुम्ही WhatsApp ची अधिकृत आवृत्ती वापरत असाल आणि तुमचे खाते बॅन झाले असेल, तर हा लेख पहा.
  • WhatsApp चा जबाबदारीने वापर कसा करावा याविषयी या लेखामध्ये अधिक जाणून घ्या.
  • स्क्रॅपिंगविषयी या लेखामध्ये अधिक जाणून घ्‍या.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही