व्हॉइस मेसेज कसे पाठवावेत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
WhatsApp चे व्हॉइस मेसेजिंग वापरून तुम्ही तुमच्या संपर्कांशी किंवा ग्रुप्समध्ये त्वरित संवाद साधू शकता. तुम्ही महत्त्वाची आणि वेळेच्या दृष्टीने संवेदनशील अशी माहिती पोहोचवण्यासाठी व्हॉइस मेसेज वापरू शकता. बाय डीफॉल्ट, सर्व व्हॉइस मेसेजेस आपोआप डाउनलोड होतात.
व्हॉइस मेसेज पाठवणे
 1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
 2. मायक्रोफोन
  वर टॅप करा आणि धरून ठेवा. त्यानंतर, बोलण्यास सुरुवात करा.
 3. बोलून झाले, की मायक्रोफोन
  वरून तुमचे बोट काढा. व्हॉइस मेसेज आपोआप पाठवला जाईल.
व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करत असताना तो रद्द करण्यासाठी
डावीकडे स्लाइड करा.
जास्त मोठा व्हॉइस मेसेज पाठवणे
 1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
 2. मायक्रोफोन
  वर टॅप करा आणि धरून ठेवा. त्यानंतर, बोलण्यास सुरुवात करा.
 3. हॅन्ड्स-फ्री रेकॉर्डिंग करण्यासाठी वरील बाजूस स्लाइड करा.
 4. बोलणे पूर्ण झाल्यावर व्हॉइस मेसेज पाठवण्यासाठी, पाठवा
  वर टॅप करा.
मोठा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करत असताना तो रद्द करण्यासाठी रद्द करा वर टॅप करा. रेकॉर्डिंग थांबवण्याकरिता किंवा तुमच्या मेसेजच्या ड्राफ्टचे पूर्वावलोकन पाहण्याकरिता, तुम्ही लाल 'थांबवा'
बटणावरदेखील टॅप करू शकता. त्याच व्हॉइस मेसेजमध्ये रेकॉर्डिंग करणे पुढे सुरू ठेवण्यासाठी लाल माइक
चिन्हावर टॅप करा.
टीप: काही फोनवर तुमच्या मेसेजची सुरुवात रेकॉर्ड होत नसेल, तर बोलणे रेकॉर्ड करण्यापूर्वी काही सेकंद थांबावे लागू शकते.
पाठवलेल्या व्हॉइस मेसेजेसवर तुम्हाला हे दिसेल:
 • सर्व प्राप्तकर्त्यांनी प्ले न केलेल्या व्हॉइस मेसेजेसवर (पण काहींनी प्ले केलेले असू शकतात) राखाडी मायक्रोफोन
  दिसेल.
 • सर्व प्राप्तकर्त्यांनी प्ले केलेल्या व्हॉइस मेसेजेसवर निळा मायक्रोफोन
  दिसेल.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही