WhatsApp सह Siri चा वापर कसा करावा

iPhone
Siri म्हणजे iOS मधील पर्सनल असिस्टंट होय. तुम्ही Siri ला WhatsApp मेसेजेस पाठवण्यास, WhatsApp कॉल्स करण्यास किंवा तुमचे न वाचलेले WhatsApp मेसेजेस मोठयाने वाचण्यास सांगू शकता.
टीप: ही फीचर्स फक्त iOS 12 आणि त्यानंतरच्या आवृत्त्यांवर उपलब्ध आहेत.
Siri सुरू करा
  1. iPhone Settings > Siri & Search > Listen for "Hey Siri" किंवा Press Side Button for Siri हे सुरू वर सेट करा.
    • iPhone SE (2020) आणि iPhone 8 व त्यापूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये: Press Home for Siri सुरू करा.
  2. खाली स्क्रोल करा आणि WhatsApp वर टॅप करा.
  3. Use with Ask Siri सुरू करा.
तुम्ही iPhone X, XS, XS Max आणि XR वर साइड बटण दाबून धरून ठेवून Siri सुरू करू शकता.
Siri चा वापर कसा करावा आणि Apple ही कंपनी Siri मार्फत आलेला डेटा कसा हाताळते ते तुम्ही Apple Support च्या वेबसाइटवर जाणून घेऊ शकता.
टीप: WhatsApp वर न वाचलेले मेसेजेस असताना WhatsApp उघडल्यास नोटिफिकेशन बॅज रिसेट होईल. यामुळे Siri ला असे वाटेल, की WhatsApp वर एकही न वाचलेला मेसेज नाही आणि Siri ते मेसेजेस मोठ्याने मेसेज वाचू शकणार नाही.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही