तुमचा फोन नंबर कसा बदलावा


'नंबर बदला' या फीचरमुळे तुम्हाला त्याच फोनवर किंवा नव्या फोनवर WhatsApp शी लिंक असलेला फोन नंबर बदलण्यात मदत होते. तुमचा फोन नंबर बदलण्याआधी हे करा:
  • तुमच्या नवीन फोन नंबरवर SMS किंवा कॉल येत असल्याची आणि त्यामध्ये उत्तम मोबाइल इंटरनेट असल्याची खात्री करा.
  • तुमच्या जुन्या फोन नंबरची WhatsApp वर नोंदणी झालेली आहे याची खात्री करा. तुम्ही WhatsApp उघडून, त्यानंतर अधिक पर्याय > सेटिंग्ज > तुमचा प्रोफाइल फोटो यावर टॅप करून तुमचा नोंदणी केलेला फोन नंबर पाहू शकता.
  • तुम्ही सपोर्ट असलेला फोन नंबर वापरत आहात याची खात्री करा. सपोर्ट नसलेल्या फोन नंबरची WhatsApp वर नोंदणी केली जाऊ शकत नाही. या फोन नंबर्समध्ये खालील फोन नंबर्सचा समावेश आहे:
  • VoIP
  • लॅंडलाइन्स (टीप: लॅंडलाइन नंबर्सना फक्त WhatsApp Business ॲपवर सपोर्ट आहे)