मेसेजेस कसे हटवावेत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही मेसेजेस फक्त तुमच्यासाठीच हटवू शकता किंवा ते मेसेजेस सर्वांसाठी हटवण्याची विनंती करू शकता.
सर्वांसाठी मेसेजेस हटवणे
सर्वांसाठी मेसेजेस हटवणे ही सुविधा वापरून तुम्ही विशिष्ट मेसेजेसना एखाद्या वैयक्तिक चॅटमधून किंवा ग्रुप चॅटमधून हटवू शकता. तुम्ही एखादा मेसेज चुकीच्या ग्रुपमध्ये पाठवता किंवा त्यामध्ये काही चूक झालेली असते अशावेळी या सुविधेचा उपयोग होतो. चॅटमधील इतर सहभागी सदस्यांनी पाठवलेले अनुचित किंवा नकोसे मेसेजेस काढून टाकण्याचा अधिकार ग्रुप ॲडमिनला असतो.
तुमच्याकडून पाठवल्या गेलेल्या आणि सर्वांसाठी हटवल्या गेलेल्या मेसेजेसच्या जागी पुढील मेसेज दिसेल:
हा मेसेज हटवण्यात आला
तुम्ही सर्वांना पाठवले आहेत असे मेसेजेस हटवण्यासाठी हे करा:
  1. WhatsApp उघडा आणि तुम्हाला जो मेसेज हटवायचा आहे त्या चॅटमध्ये जा.
  2. मेसेजवर टॅप करून धरून ठेवा. किंवा, एकापेक्षा अधिक मेसेजेस हटवण्यासाठी अधिक मेसेजेस निवडा.
  3. हटवा
    > सर्वांसाठी हटवा यावर टॅप करा.
तुम्ही ग्रुपचे ॲडमिन असाल, तर तुम्ही ग्रुपमधील दुसऱ्या एखाद्या सहभागी सदस्याने पाठवलेले मेसेजेस हटवू शकता. यामुळे ग्रुप ॲडमिन्सना अनुचित किंवा गैर मेसेजेस अथवा मीडिया फाइल्स सर्वांसाठी हटवून खाजगी ग्रुप्स आणि कम्युनिटीजना व्यवस्थापित करता येते. एखादा अ‍ॅडमिन एखादा मेसेज सर्वांकरिता हटवतो, तेव्हा त्या मेसेजच्या जागी हा मेसेज दिसेल:
“हा मेसेज ॲडमिनने [अ‍ॅडमिनचे नाव] हटवला ”
ग्रुपमधील दुसऱ्या एखाद्या सहभागी सदस्याने पाठवलेला मेसेज हटवण्याकरिता हे करा:
  1. WhatsApp उघडा आणि तुम्हाला जो मेसेज हटवायचा आहे त्या चॅटमध्ये जा.
  2. मेसेजवर टॅप करून धरून ठेवा.
  3. हटवा
    > सर्वांसाठी हटवा > ठीक आहे यावर टॅप करा.
टीप:
  • सर्वांसाठी मेसेजेस यशस्वीरीत्या हटवण्याकरिता तुम्ही आणि प्राप्तकर्त्यांनी WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरणे आवश्यक आहे.
  • तुम्ही पाठवलेली मीडिया फाइल तो मेसेज WhatsApp चॅटमधून हटवलेला असतानाही iOS साठी WhatsApp वापरणाऱ्या‍ प्राप्तकर्त्यांच्या फोटोंमध्ये सेव्ह केलेली असू शकते.
  • मेसेज हटवणे यशस्वी न झाल्यास किंवा हटवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर प्राप्तकर्त्यांना तो मेसेज दिसू शकतो.
  • सर्वांसाठी हटवणे यशस्वीरीत्या पूर्ण न झाल्यास तुम्हाला त्याची सूचना मिळणार नाही.
  • तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर तो सर्वांसाठी हटवला जाण्याची विनंती करण्यासाठी तुमच्याकडे साधारण २ दिवस असतील.
  • ग्रुपमधील इतर सहभागी सदस्यांनी पाठवलेले मेसेजेस फक्त ग्रुप ॲडमिन्सना हटवता येतात.
  • एखाद्या सहभागी सदस्याने एखादा मेसेज सर्वांसाठी हटवला जाण्याची विनंती केल्यानंतर तो मेसेज हटवण्यासाठी ग्रुप ॲडमिन्सकडे साधारण २ दिवस असतात.
  • कोणत्या ग्रुप ॲडमिनने मेसेज सर्वांसाठी हटवला हे ग्रुपमधील सहभागी सदस्यांना पाहता येईल.
  • ग्रुप ॲडमिनने हटवलेले मेसेजेस पुन्हा मिळवता येत नाहीत आणि त्यावर अपील करता येत नाही.
स्वतःसाठी मेसेजेस हटवणे
तुम्ही तुमच्या फोनमधून पाठवलेल्या किंवा प्राप्त केलेल्या मेसेजेसची तुमची कॉपी हटवू शकता. याचा परिणाम तुमच्या प्राप्तकर्त्याच्या चॅटवर होत नाही. तुमच्या प्राप्तकर्त्यांना त्यांच्या चॅट स्क्रीनमध्ये अजूनही मेसेजेस दिसतील.
स्वतःसाठी मेसेजेस हटवण्यासाठी हे करा:
  1. WhatsApp सुरू करा आणि तुम्हाला जो मेसेज हटवायचा आहे त्या चॅटमध्ये जा.
  2. मेसेजवर टॅप करून धरून ठेवा. तुम्हाला हवे असल्यास, एकापेक्षा अधिक मेसेजेस हटवण्यासाठी अधिक मेसेजेसवर टॅप करा.
  3. स्क्रीनच्या वरील भागावर हटवा
    > माझ्यासाठी हटवा यावर टॅप करा.
टीप: माझ्यासाठी हटवा निवडल्यानंतर मेसेज कायमचा हटवण्यापूर्वी पूर्ववत करा वर टॅप करून ही क्रिया पूर्ववत करण्यासाठी तुमच्याकडे ५ सेकंद असतात.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर मेसेजेस कसे हटवावेत: iPhone | KaiOS
पुढील प्लॅटफॉर्म्सवर चॅट्स कशी पुसावीत: Android | iPhone
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही