Chrome वर नोटिफिकेशन्स न मिळणे

तुम्हाला WhatsApp वेब वर नोटिफिकेशन्स मिळत नसतील, तर तुमच्या ब्राउझरमध्ये नोटिफिकेशन्स सुरू आहेत याची खात्री करा.
नोटिफिकेशन्स सुरू करणे
  1. तुमच्या ब्राउझरमध्ये, तुमच्या चॅट्सच्या यादीच्या वर असलेल्या निळ्या बॅनरमधील डेस्कटॉप नोटिफिकेशन्स सुरू करा वर क्लिक करा.
  2. त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांचे पालन करा.
टीप : निळे बॅनर दिसत नसल्यास पेज रिफ्रेश करा. तुम्हाला अजूनही बॅनर दिसत नसेल, तर तुम्ही तुमच्या WhatsApp सेटिंग्ज मध्ये नोटिफिकेशन्स म्यूट किंवा बंद केली असल्याची शक्यता आहे.
नोटिफिकेशन्स अनब्लॉक करणे
  1. तुमच्या ब्राउझरमध्ये, अधिक आयकॉन > सेटिंग्ज वर क्लिक करा.
    • किंवा, Chrome > प्राधान्ये… वर क्लिक करा.
  2. गोपनीयता आणि सुरक्षा याअंतर्गत साइट सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स वर क्लिक करा.
  3. पाठवण्याआधी विचारा (याची शिफारस करतो) सुरू आहे याची खात्री करा.
  4. "https://web.whatsapp.com" ब्लॉक केलेले यादीमध्ये असल्यास, त्याच्या बाजूचा अधिक आयकॉन > परवानगी द्या वर क्लिक करा.
संबंधित लेख :
हे मदतीचे होते का?
होय
नाही