बिझनेस फीचर्सविषयी माहिती

गोपनीयता धोरणामधील जानेवारी २०२१ मधील अपडेट्सचा वैयक्तिक मेसेजेसच्या गोपनीयतेवर काहीही परिणाम होणार नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्या. हे बदल WhatsApp वरील बिझनेसशी निगडित वैकल्पिक फीचर्सच्या बाबतीतले आहेत आणि तुम्ही ही फीचर्स वापरण्याचा पर्याय निवडल्यास, आम्ही कोणता डेटा गोळा करतो आणि वापरतो हे या अपडेटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

काय बदललेले नाही?

तुमच्या वैयक्तिक मेसेजेसची आणि कॉल्सची गोपनीयता व सुरक्षा अजिबात बदललेली नाही. तुमच्या वैयक्तिक मेसेजेसना आणि कॉल्सना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनचे संरक्षण लाभले आहे आणि WhatsApp व Meta ते वाचू किंवा ऐकू शकत नाही. आम्ही ही सुरक्षा कधीच काढून घेणार नाही. तुमचे मेसेजेस व कॉल्स सुरक्षित राखण्याप्रती आमची वचनबद्धता तुम्हाला कळावी यासाठी आम्ही त्यांना तसे लेबलही देतो.

वैकल्पिक बिझनेस फीचर्स

१७.५ कोटींहून जास्त लोक दररोज WhatsApp वरील बिझनेसेससोबत संभाषण करत असतात आणि त्यांना उत्तम सपोर्ट मिळावा म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. बिझनेसशी होणाऱ्या संभाषणांच्या संदर्भातील अपडेट हा बिझनेसशी होणारी संभाषणे अधिक उत्तम, सुरक्षित व सुलभ करण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रयत्नांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
  • कस्टमर सर्व्हिस सुलभ करणे: एखाद्या बिझनेसला त्यांच्या प्रॉडक्ट्सविषयी प्रश्न विचारणे, खरेदीचा निर्णय घेण्यासाठी चर्चा करणे किंवा खरेदीची पावती यासारखी उपयुक्त माहिती मिळवणे या कारणांसाठी लोक त्या बिझनेसशी थेट चॅटमधून संभाषण करण्यास प्राधान्य देऊ शकतात. आता आम्ही Meta बिझनेस प्रॉडक्ट्स वापरणाऱ्या बिझनेससोबत चॅट करणे सुलभ करत आहोत. काही बिझनेसना ग्राहकांशी होणारी संभाषणे व्यवस्थापित करण्यासाठी होस्टिंग सर्व्हिसेसची मदत घ्यावी लागते. या होस्टिंग सर्व्हिसेस Meta पुरवणार आहे. एखादा बिझनेस या होस्टिंग सर्व्हिसेस वापरत असेल, तर आम्ही त्यांच्यासोबत होणाऱ्या चॅटला तसे स्पष्ट लेबल देतो. या माहितीच्या आधारावर त्यांना मेसेज करायचा की नाही हा निर्णय फक्त तुमचा आहे.
  • नव्या बिझनेसची माहिती मिळणे: Facebook किंवा Instagram वरील जाहिरातींवरून लोकांना नवनव्या बिझनेसविषयी माहिती मिळत राहते. त्या जाहिरातीवर असणाऱ्या बटणावर क्लिक करून तुम्ही त्या बिझनेसला WhatsApp द्वारे मेसेज करू शकता. Facebook वरील इतर जाहिरातींप्रमाणे या जाहिरातींवरही क्लिक केल्यास त्याचा वापर तुम्हाला Facebook वर दिसणाऱ्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी केला जाऊ शकतो. पुन्हा एकदा, एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा लाभलेल्या तुमच्या मेसेजेसमध्ये काय आहे हे WhatsApp आणि Meta पाहू शकत नाही.
  • शॉपिंगचा अनुभव: अधिकाधिक लोक ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय निवडत आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. जिथे उपलब्ध असेल तिथे, Facebook किंवा Instagram वर शॉप असणाऱ्या बिझनेसेसची शॉप्स त्यांच्या WhatsApp बिझनेस प्रोफाइलवर आधीपासूनच असू शकतात. यामुळे तुम्हाला त्या बिझनेसची प्रॉडक्ट्स Facebook किंवा Instagram वर पाहून ती WhatsApp वरून थेट खरेदी करता येऊ शकतात. तुम्ही या 'शॉप्स'शी संभाषण करण्याचा पर्याय निवडल्यास तुमचा डेटा Meta सोबत कशा प्रकारे शेअर केला जाईल हे आम्ही तुम्हाला WhatsApp वर कळवू.
पूर्णपणे पर्यायी असणाऱ्या या फीचर्सविषयी आणि आम्ही Meta सोबत मिळून कसे काम करतो हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?

होय
नाही