वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट संग्रहित किंवा असंग्रहित कसे करावे

तुमची संभाषणे चॅट लिस्टमध्ये नीटनेटकी दिसण्यासाठी, 'चॅट संग्रहित करा' हे फीचर वापरून तुम्ही तुमच्या चॅट लिस्टमधून वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट लपवून ठेऊ शकता.
टीप:
  • चॅट संग्रहित केल्याने ते हटवले जात नाही किंवा तुमच्या SD कार्डवर त्याचा बॅकअपदेखील घेतला जात नाही.
  • संग्रहित केलेली वैयक्तिक चॅट्स किंवा ग्रुप चॅट्स ही तुम्हाला त्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये नवीन मेसेजेस आल्यावरदेखील संग्रहितच राहतील.
  • तुम्हाला कोणी नमूद केले असेल किंवा उत्तर दिले असेल, तरच तुम्हाला संग्रहित चॅट्ससाठी नोटिफिकेशन्स मिळतील.
वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट संग्रहित करणे
  1. चॅट टॅबमध्ये, तुम्हाला लपवायचे असलेल्या चॅटवर टॅप करून धरून ठेवा.
  2. स्‍क्रीनच्या सर्वात वर असलेल्या
    संग्रहित वर टॅप करा.
सर्व चॅट्स संग्रहित करणे
  1. चॅट टॅबमध्ये, आणखी पर्याय
    > सेटिंग्ज वर टॅप करा.
  2. चॅट > पूर्वीचे चॅट > सर्व चॅट्स संग्रहित करा वर टॅप करा.
संग्रहित वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट पाहणे
  1. चॅट स्क्रीनच्या वरपर्यंत स्क्रोल करा.
  2. संग्रहित वर टॅप करा.
संग्रहित च्या समोर दिसणारा आकडा वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये न वाचलेले किती संग्रहित मेसेजेस आहेत ते दर्शवेल.
वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट असंग्रहित करणे
  1. चॅट स्क्रीनच्या वरपर्यंत स्क्रोल करा.
  2. संग्रहित वर टॅप करा.
  3. तुम्हाला जे चॅट किंवा ग्रुप चॅट असंग्रहित करायचे आहे, त्यावर टॅप करून धरून ठेवा.
  4. स्‍क्रीनच्या सर्वात वर असलेल्या असंग्रहित करा वर टॅप करा.
वैकल्पिक संग्रहण सेटिंग्ज
नवीन मेसेजेस प्राप्त झाल्यावर संग्रहित चॅट्स असंग्रहित व्हावीत आणि तुमच्या चॅट लिस्टमध्ये सर्वात वर
संग्रहित दिसणे बंद व्हावे यासाठी डिफॉल्ट सेटिंग्ज बदलण्याकरिता हे करा:
  1. चॅट टॅबमध्ये, आणखी पर्याय
    > सेटिंग्ज वर टॅप करा
  2. चॅट वर टॅप करा.
  3. चॅट्स संग्रहित राहू देत बंद करा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर चॅट किंवा ग्रुपला संग्रहित किंवा असंग्रहित कसे करावे: iPhone | वेब आणि डेस्कटॉप | KaiOS
हे मदतीचे होते का?
होय
नाही