WhatsApp परवानग्यांविषयी माहिती

Android
iPhone
तुमच्या iPhone मधील फोटो आणि व्हिडिओ WhatsApp वर वापरण्यासाठी तुम्ही या ॲपला तशी परवानगी देणे आवश्यक आहे. तुम्ही फोटो वापरण्याची परवानगी दिली नाही, तर तुम्हाला हा अलर्ट दिसेल:
परवानगी देणे
तुम्ही iPhone च्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये जाऊन परवानगी बदलू शकता.
  1. iPhone मधील Settings
    > Privacy वर जा.
  2. Photos > WhatsApp > Read and Write यावर टॅप करा.
WhatsApp उघडा. आता तुम्हाला तुमच्या iPhone वरील फोटो WhatsApp वर वापरता येणे शक्य होईल.
गोपनीयता सेटिंग्जमध्ये WhatsApp करड्या रंगात दिसत असेल किंवा अजिबात दिसतच नसेल, तर:
तुम्ही तुमच्या iPhone वर Settings > Screen Time येथे काही मर्यादा सेट केलेल्या नाहीत याची खात्री करून घ्या. नाहीतर, तुम्हाला तुमच्या फोनचा बॅकअप घ्यावा लागेल आणि तो रिस्टोअर करावा लागेल.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही