WhatsApp परवानग्यांविषयी माहिती

Android
iPhone
तुम्ही WhatsApp मध्ये पहिल्यांदा फीचर्स वापरता, तेव्हा WhatsApp ला तुमच्या iPhone मधील माहिती किंवा ॲप्लिकेशनचा ॲक्सेस आवश्यक असू शकतो. परवानग्या बंद केल्याने WhatsApp च्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो हे कृपया लक्षात घ्या.
तुम्ही आधीच WhatsApp इंस्टॉल केलेले असेल तर तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमधून ॲपच्या परवानग्या नियंत्रित करू शकता. तुम्ही या पायऱ्या वापरून तुमच्या iPhone ची ॲक्सेससंबंधित सेटिंग्ज तपासू शकता:
  1. iPhone सेटिंग्ज मध्ये, खाली स्क्रोल करून WhatsApp वर टॅप करा.
  2. WhatsApp ला हे ॲक्सेस करण्याची अनुमती द्या अंतर्गत, परवानग्यांचा ॲक्सेस सुरू करा. तुम्ही वैयक्तिक परवानग्यांचा ॲक्सेस मर्यादित करण्याचा पर्यायदेखील निवडू शकता.
फोटो आणि व्हिडिओ परवानग्या
फोटो आणि व्हिडिओ WhatsApp वर वापरण्यासाठी तुम्ही या ॲपला फोटो ॲक्सेस करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. तुम्ही फोटो वापरण्याची परवानगी दिली नाही, तर तुम्हाला हा अलर्ट दिसेल:
  • "WhatsApp ला तुमच्या फोटो आणि व्हिडिओचा ॲक्सेस नाही. ॲक्सेस सुरू करण्यासाठी, सेटिंग्जवर टॅप करा आणि फोटो सुरू करा."
परवानगी देणे
तुम्ही iPhone च्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये जाऊन परवानगी बदलू शकता.
  1. iPhone सेटिंग्ज
    > गोपनीयता यावर जा.
  2. फोटो > WhatsApp > रीड आणि राइट यावर टॅप करा.
WhatsApp उघडा. आता तुम्हाला तुमच्या iPhone वरील फोटो WhatsApp वर वापरता येणे शक्य होईल.
गोपनीयता सेटिंग्जमध्ये WhatsApp करड्या रंगात दिसत असल्यास किंवा अजिबात दिसत नसल्यास
iPhone सेटिंग्ज > स्क्रीन वेळ यामध्ये कोणत्याही मर्यादा सेट केलेल्या नसल्याची खात्री करा. नाहीतर, तुम्हाला तुमच्या फोनचा बॅकअप घ्यावा लागेल आणि तो रिस्टोअर करावा लागेल.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही