ग्रुप ॲडमीन्स कसे व्यवस्थापित करावेत

ग्रुपमधील कोणत्याही ॲडमीनला दुसऱ्या एखाद्या सहभागी सदस्याला ॲडमीन करू घेता येते. ग्रुपमध्ये कितीही ॲडमीन्स असू शकतात. ग्रुपच्या मूळ निर्माणकर्त्याला काढून टाकले जाऊ शकत नाही आणि जोपर्यंत ते ग्रुप सोडत नाहीत तोपर्यंत ते ॲडमीन राहतात.
सहभागी सदस्याला ॲडमीन बनवणे
  1. WhatsApp मधील ग्रुप चॅट उघडा, त्यानंतर पर्याय > ग्रुपची माहिती वर प्रेस करा.
    • किंवा, तुमच्या चॅट सूचीमधील ग्रुप निवडा. त्यानंतर पर्याय > ग्रुपची माहिती वर प्रेस करा.
  2. तुम्हाला ज्यांना ॲडमीन बनवायचे आहे ते सदस्य निवडा.
  3. पर्याय > ग्रुप ॲडमीन बनवा वर प्रेस करा.
ॲडमीनला पदावरून हटवणे
  1. WhatsApp मधील ग्रुप चॅट उघडा, त्यानंतर पर्याय > ग्रुपची माहिती वर प्रेस करा.
    • किंवा, तुमच्या चॅट सूचीमधील ग्रुप निवडा. त्यानंतर पर्याय > ग्रुपची माहिती वर प्रेस करा.
  2. ज्यांना ॲडमीन पदावरून हटवायचे आहे ते सदस्य निवडा.
  3. पर्याय > ॲडमीन पदावरून हटवा वर प्रेस करा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही