ग्रुप ॲडमीन्स कसे व्यवस्थापित करावेत

ग्रुपमधील कोणत्याही ॲडमीनला दुसऱ्या एखाद्या सहभागी सदस्याला ॲडमीन करू घेता येते. ग्रुपमध्ये कितीही ॲडमीन्स असू शकतात. ग्रुपच्या मूळ निर्माणकर्त्याला काढून टाकले जाऊ शकत नाही आणि जोपर्यंत ते ग्रुप सोडत नाहीत तोपर्यंत ते ॲडमीन राहतात.
सहभागी सदस्याला ॲडमीन बनवणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट वर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
    • किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > ग्रुपची माहिती वर टॅप करा.
  2. तुम्हाला ज्या सदस्याला ॲडमीन बनवायचे आहे त्याच्या नावावर टॅप करा.
  3. ग्रुप ॲडमीन बनवा वर टॅप करा.
एकाचवेळी अनेक सहभागी सदस्यांना ॲडमीन बनवणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट वर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
    • किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > ग्रुपची माहिती वर टॅप करा.
  2. ग्रुप सेटिंग्ज > ग्रुप ॲडमीन्स संपादित करा वर टॅप करा.
  3. तुम्हाला ज्यांना ॲडमीन बनवायचे आहे ते सदस्य निवडा.
  4. पूर्ण झाले वर टॅप करा.
ॲडमीनला पदावरून हटवणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट वर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
    • किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > ग्रुपची माहिती वर टॅप करा.
  2. ज्यांना ॲडमीन पदावरून हटवायचे आहे त्यांची निवड रद्द करा.
  3. ॲडमीन पदावरून काढा वर टॅप करा.
एकावेळी अनेकांना ॲडमीन पदावरून हटवणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट वर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
    • किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > ग्रुपची माहिती वर टॅप करा.
  2. ग्रुप सेटिंग्ज > ग्रुप ॲडमीन्स संपादित करा वर टॅप करा.
  3. ज्यांना ॲडमीन पदावरून हटवायचे आहे त्या सदस्यांची निवड रद्द करा.
  4. पूर्ण झाले वर टॅप करा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही