WhatsApp च्या बिझनेस आणि कॉमर्स पॉलिसीचे अनुपालन कसे करावे

WhatsApp Business प्लॅटफॉर्मसाठी आमच्या मदतपर आशयाची लायब्ररी येथे पहा.
बिझनेसेसनी WhatsApp Business प्लॅटफॉर्म आणि WhatsApp Business ॲपचा समावेश असलेले WhatsApp Business वापरून त्यांच्या ग्राहकांना मेसेज करण्याच्या सर्व लाभांचा आनंद घ्यावा असे आम्हाला वाटते. सुरक्षित आणि उच्च गुणवत्तेच्या संभाषणांची खात्री करण्यासाठी, बिझनेसेस आणि सोल्युशन प्रोव्हायडर्सनी WhatsApp च्या बिझनेस आणि कॉमर्स या दोन्ही पॉलिसी समजून घेणे महत्त्वाचे आहे.
या दोन्ही पॉलिसी WhatsApp Business ला लागू होतात. बिझनेस पॉलिसी मुळे WhatsApp Business प्रॉडक्ट्सचा स्वीकारार्ह वापर कसा असावा आणि दर्जेदार ग्राहक अनुभवाची खात्री करण्याकरिता अपेक्षा काय असाव्यात हे ठरवता येते. यामुळे या प्लॅटफॉर्मवर कोणत्या बिझनेस मॉडेल्स आणि व्हर्टिकल्सना अनुमती द्यावी हे निर्धारित करण्यात आम्हाला मदत होते. बिझनेसेस त्यांचा कॅटलॉग, मेसेज थ्रेड्स, बिझनेस प्रोफाइल आणि मेसेज टेम्प्लेट्स यांमध्ये त्यांच्या प्रॉडक्ट्सची आणि सर्व्हिसेसची विक्री करू शकतात की नाही हे ठरवण्यासाठी कॉमर्स पॉलिसी वापरली जाते.
WhatsApp Business वापरणाऱ्या प्रत्येकाने WhatsApp च्या बिझनेस आणि कॉमर्स या दोन्ही पॉलिसी वाचाव्यात अशी आम्ही शिफारस करतो. परंतु, कधीकधी पॉलिसीच्या काही बाबींविषयी, जसे की- आम्ही पॉलिसी कशी लागू करतो किंवा पॉलिसीमुळे विशिष्ट प्रकारच्या बिझनेसेसवर कसा परिणाम होतो, तुम्हाला अतिरिक्त प्रश्न असू शकतात हे आम्हाला समजते.
बिझनेस आणि कॉमर्स पॉलिसीचे अनुपालन करणे
कॉमर्स पॉलिसीनुसार प्रतिबंधित असलेल्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसची विक्री करणाऱ्या बिझनेसेसना फक्त़ ठरावीक विक्रीपूर्व आणि विक्रीपश्चात संभाषणांकरिता वापर होणार असेल, तरच WhatsApp Business वापरता येईल.
विक्रीशी संबंधित अनुमती नसलेल्या काही अ‍ॅक्टिव्हिटीज पुढीलप्रमाणे आहेत:
 • बिझनेसेसनी त्यांच्या बिझनेस प्रोफाइलवर प्रतिबंधित प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसना प्रमोट करणे
 • WhatsApp Business प्लॅटफॉर्मवर प्रतिबंधित प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसची विक्री करण्याशी संबंधित टेम्प्लेट्स तयार करणे आणि पाठवणे
 • प्रतिबंधित प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसची खरेदी किंवा ट्रान्झॅक्शन करण्यासाठी WhatsApp वरील थ्रेडमध्ये सहभागी होणे, जसे की - थ्रेडमध्येच ऑर्डर पूर्ण करणे, खरेदी सुरू करण्यासाठी पेमेंट गोळा करणे, ऑर्डर अपडेट करणे किंवा पावती शेअर करणे
कॉमर्स पॉलिसी नुसार प्रतिबंधित प्रॉडक्ट्स व सर्व्हिसेसची विक्री करणारे बिझनेसेस आणि ग्राहक यांमधील अनुमती असलेल्या आणि अनुमती नसलेल्या संभाषणांची काही उदाहरणे आम्ही दिली आहेत.
अनुमती असलेली संभाषणे
 • जागरूकतेसाठी केलेली संभाषणे: प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसविषयी अतिरिक्त माहिती शेअर करणे अथवा ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे
 • जागरूकतेसाठी/विचार व्हावा म्हणून/ग्राहकांप्रती प्रेम जतवण्यासाठी केलेली संभाषणे: वापरकर्त्यासोबत थ्रेडमध्ये कूपन किंवा प्रमोशन शेअर करणे
 • विचार व्हावा म्हणून केलेली संभाषणे: प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी करण्यात स्वारस्य असलेल्या वापरकर्त्यासोबत वेबसाइट लिंक किंवा फोन नंबर शेअर करणे
अनुमती नसलेली संभाषणे
 • खरेदी: वापरकर्त्याने खरेदी करायची असलेली प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस थ्रेडमध्येच निवडणे आणि बिझनेसने WhatsApp वर पेमेंट माहिती गोळा करणे
 • खरेदी: प्रतिबंधित प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसची विक्री केल्यानंतर पावतीसाठी नोटिफिकेशन पाठवणे
WhatsApp वरील प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसच्या विक्रीमधील ट्रान्झॅक्शनवरील या मर्यादा फक्त कॉमर्स पॉलिसी मधील प्रतिबंधित कॅटेगरीजना लागू होतात. कॉमर्स पॉलिसी नुसार विक्री करण्याची अनुमती असलेल्या कोणत्याही प्रॉडक्ट आणि सर्व्हिसला WhatsApp Business वर अनुमती आहे. उदाहरणार्थ, टी-शर्ट्स हे प्रतिबंधित प्रॉडक्ट नसल्यामुळे ते WhatsApp Business प्लॅटफॉर्म किंवा WhatsApp Business ॲप वापरून खरेदी करता येते.
ग्राहकांशी संवाद साधणे
आमच्या बिझनेस पॉलिसी नुसार, बिझनेसेसना WhatsApp वर एखाद्या व्यक्तीशी फक्त तेव्हाच संपर्क साधता येईल, जेव्हा:
 • त्या व्यक्तीने त्यांचा मोबाइल फोन नंबर बिझनेसला दिलेला असतो
 • त्या व्यक्तीने WhatsApp वर बिझनेसद्वारे संपर्क साधण्यासाठी सहमती दर्शवलेली असते
बिझनेस संभाषणांद्वारे लोकांना गोंधळात टाकणे, फसवणे, लुबाडणे, त्यांची दिशाभूल करणे, स्पॅम करणे किंवा चकित करणे हे आमच्या बिझनेस पॉलिसीचे उल्लंघन आहे. याव्यतिरिक्त, वैयक्तिक पेमेंट कार्डचे संपूर्ण नंबर्स, आर्थिक खात्यांचे नंबर्स, वैयक्तिक आयडी कार्ड्सचे नंबर्स किंवा ओळख दर्शवणारी इतर कोणतीही संवेदनशील माहिती बिझनेसेस शेअर करू शकत नाही किंवा लोकांना ती शेअर करण्यास सांगू शकत नाही.
WhatsApp Business प्लॅटफॉर्मवर एखाद्या बिझनेसला २४ तास उलटून गेल्यानंतर ग्राहकांना बिझनेसशी संबंधित कोणतेही मेसेजेस पाठवता यावेत, यासाठी ग्राहकांनी त्या बिझनेससोबत चॅट करण्यासाठी 'ऑप्ट-इन' करणे आवश्यक आहे.
टीप: एखाद्या वापरकर्त्याने प्रश्न विचारण्यासाठी किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी बिझनेसशी संपर्क साधण्याचा अर्थ त्यांनी 'ऑप्ट-इन' केले आहे असा होत नाही. WhatsApp वर यापुढेही मेसेजेस प्राप्त व्हावेत यासाठी वापरकर्त्याने 'ऑप्ट-इन' करणे हे बिझनेससाठी आवश्यक आहे. 'ऑप्ट-इन'शी संबंधित आवश्यकता आणि सर्वोत्तम पद्धती यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बिझनेस पॉलिसी पहा.
कॉमर्स पॉलिसीमधील विशिष्ट कॅटेगरीजविषयी अधिक जाणून घ्या
कॉमर्स पॉलिसीमधील काही कॅटेगरीज इतर कॅटेगरीजपेक्षा अधिक गुंतागुंतीच्या आहेत. त्यांपैकी काही कॅटेगरीजमध्ये कॉमर्स पॉलिसीचे उल्लंघन कसे टाळावे याविषयीची माहिती पुढे दिली आहे.
प्रिस्क्रिप्शन, मनोरंजनपर किंवा इतर प्रकारचे अंमली पदार्थ
आम्ही अशा बिझनेसेसना अनुमती देत नाही ज्यांचा प्राथमिक बिझनेस फार्मास्युटिकल अंमली पदार्थांची थेट विक्री किंवा ट्रान्झॅक्शन करणे हा आहे. प्रिस्क्रिप्शन आणि थेट काउंटरवर मिळणाऱ्या अंमली पदार्थांची जागतिक किंवा स्थानिक स्तरावरील मान्यता स्थिती काहीही असली, तरीही हे निर्बंध त्यांना लागू होतात. कॉमर्स पॉलिसी अनुसार प्रतिबंधित असलेले अंमली पदार्थ, वैद्यकीय उपकरणे आणि इतर वस्तूंचा प्रचार किंवा विक्री करण्यापासून फार्मसींना प्रतिबंधित केलेले आहे. या बिझनेसेसना वैद्यकीय सेवा प्रदान करण्याशी संबंधित नसलेले कस्टमर केअर मेसेजेस पाठवण्याकरिता WhatsApp Business वापरण्यापासूनही प्रतिबंधित केलेले आहे. उदाहरणार्थ, डॉक्टरांना किंवा इतर वैद्यकीय सेवांना प्रिस्क्रिप्शनपर औषधे शेअर करता येतील. पण, WhatsApp प्लॅटफॉर्मवर प्रिस्क्रिप्शनपर औषधांची थेट विक्री करता येणार नाही.
असे असले, तरी स्वतंत्र वैद्यकीय प्रयोगशाळा किंवा रूग्णसेवा असलेल्या फार्मसींना त्या सर्व्हिसेसची नोंदणी WhatsApp Business वर करता येईल. त्यासाठी त्यांनी पुढील आवश्यकतांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे:
 • WhatsApp Business खात्याचे नाव वैद्यकीय सेवेचा संदर्भ देणारे असावे (उदाहरणार्थ, “दवाखाना”, “प्रयोगशाळा”, “चाचणी” किंवा “लस”.)
 • तो बिझनेस लसीकरण आणि/किंवा वैद्यकीय चाचणी अशा सेवा प्रदान करतो असे त्या बिझनेसच्या वेबसाइटवर स्पष्टपणे नमूद केलेले असावे
डॉक्टरांचे दवाखाने किंवा रुग्णालये यांसारख्या वैद्यकीय सेवांचा त्यांच्या ग्राहकांशी जसा संवाद चालतो, तशाचप्रकारे फार्मसींनाही ग्राहकांशी संवाद साधण्याची अनुमती असेल. थेट विक्री न करणाऱ्या निर्मात्यांना आणि आरोग्य सेवांनादेखील अनुमती आहे.
मंजुरी मिळालेल्या वैद्यकीय सेवाविषयक अ‍ॅक्टिव्हिटींची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत:
 • एखादी व्यक्ती लस घेण्यास पात्र आहे का हे सांगण्यासाठी पर्सनलाइझ केलेली अपडेट्स पाठवणे
 • चाचणी करण्यासाठी आणि लस देण्यासाठी अपॉइंटमेंट्स ठरवणे
 • चाचणी आणि लसीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देणे
 • COVID-19 आणि लसीशी संबंधित माहिती यांसह इतर वैद्यकीय सेवांविषयी वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी चॅटबॉट नेमणे
 • भेटीनंतरची सर्वेक्षणे आणि अपॉइंटमेंटचे फॉलो-अप्स पाठवणे
असुरक्षित इंजेस्टेबल सप्लिमेंट्स
कॉमर्स पॉलिसी नुसार सप्लिमेंट्स प्रतिबंधित केलेली आहेत. कॅटलॉग, शॉप्स, मेसेज थ्रेड्स, बिझनेस प्रोफाइल आणि/किंवा मेसेज टेम्प्लेट्समध्ये सप्लिमेंट्सची विक्री करण्यास अनुमती नाही.
प्रतिबंधित सप्लिमेंट्सची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत:
 • अ‍ॅनाबॉलिक स्टिरॉइड्स
 • कायटोसॅन
 • कॉंफ्री
 • डिहायड्रोएपिॲंड्रोस्टेरॉन (डीएचईए)
 • एफेड्रा
 • ह्युमन ग्रोथ हार्मोन्स
 • प्रोटीन बार्स आणि प्रोटीन पावडर
 • व्हिटॅमिन्स
डिजिटल सर्व्हिसेस
WhatsApp वर मोबाइल रिचार्जेस, केबल टीव्ही पॅकेजेस आणि इंटरनेट पॅक्स यांसारख्या सर्व्हिसेसची विक्री करण्याची अनुमती आहे.
ज्या डिजिटल सर्व्हिसेसचा प्राथमिक बिझनेस सदस्यत्व, डाउनलोड करण्यायोग्य आशय ऑफर करणे किंवा डिजिटल आशय लायब्ररीचा ॲक्सेस मिळवून देणे हा आहे, त्या सर्व्हिसेस WhatsApp चा वापर करू शकत नाहीत. तरी त्या त्या वेळी परिस्थितीनुसार, आम्ही अशा बिझनेसेसना बिझनेस संभाषणासाठी WhatsApp Business प्लॅटफॉर्मचा मर्यादित क्षमतेमध्ये वापर करण्याची अनुमती देऊ शकतो.
प्रतिबंधित डिजिटल सर्व्हिसेसची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत:
 • सदस्यत्वे किंवा स्ट्रीमिंग सर्व्हिसेस
 • क्लाउड स्टोरेज
 • VPN सर्व्हिसेस
 • गेममध्ये वापरले जाणारे चलन
 • डाउनलोड कोड्स
 • ईबुक्स
 • ऑडिओबुक्स
वास्तविक, व्हर्चुअल किंवा खोटे चलन
वास्तविक पैसे म्हणजेच रोख पैसै किंवा वास्तविक जगात आर्थिक मूल्य आहे अशी समतुल्य आर्थिक साधने.
प्रतिबंधित वास्तविक चलनाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत:
 • US डॉलर्स
 • धनादेश
 • प्रीपेड डेबिट कार्ड्स
 • गिफ्ट कार्ड्स
आभासी चलन खाजगी संस्थांद्वारे जारी केले जाते आणि सर्वसाधारणपणे विशिष्ट समुदायाबाहेर त्यास वास्तविक आर्थिक मूल्य नसते.
प्रतिबंधित आभासी चलनाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत:
 • गेममध्ये वापरले जाणारे चलन
 • क्रिप्टोकरन्सी
खोटे चलन म्हणजेच बनावट किंवा नकली चलन अथवा तत्सम आर्थिक साधने.
अल्कोहोल
ज्या बिझनेसेसचा प्राथमिक बिझनेस अल्कोहोलची (अल्कोहोलयुक्त पेये आणि अल्कोहोल तयार करण्यासाठी वापरली जाणारी किट्स इ.) विक्री करणे हा आहे, ते बिझनेसेस ही प्रॉडक्ट्स विकण्यासाठी WhatsApp प्लॅटफॉर्मचा वापर करू शकत नाहीत.
असे असले, तरी एखादा बिझनेस त्यांच्या बिझनेसचा भाग म्हणून इतर वस्तू किंवा अल्कोहोलशी संबंधित प्रॉडक्ट्ससह (जसे की ग्लासेस, कूलर्स, वाइन बॉटल होल्डर्स आणि अल्कोहोलशी संबंधित पुस्तके किंवा DVD) अल्कोहोलची विक्री करत असल्यास, त्यांना विक्रीशी संबंधित नसलेले मेसेजेस पाठवण्यासाठी WhatsApp प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. त्यांना त्यांच्या प्रॉडक्ट कॅटलॉगमध्ये अल्कोहोल सूचीबद्ध करता येणार नाही.
शस्त्रे
ज्या बिझनेसेसचा प्राथमिक बिझनेस आणि प्राथमिक स्वरुपाचे काम हे शस्त्रे, दारुगोळा किंवा स्फोटके उपलब्ध करून देणे, त्यांची विक्री किंवा वापर करणे हे आहे, ते बिझनेसेस ही प्रॉडक्ट्स विकण्यासाठी WhatsApp प्लॅटफॉर्मचा वापर करू शकत नाहीत.
प्रतिबंधित शस्त्रांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत:
 • बंदुकी आणि बंदुकींचे भाग
 • पेंटबॉल गन्स
 • BB गन्स
 • फटाके
 • पेपर स्प्रे
 • टेझर्स
 • गन रेंजेस
 • गन शो
असे असले, तरी शस्त्रांची विक्री करणे हे बिझनेसच्या अनेक कामांपैकी एक काम असेल किंवा तो बिझनेस सुरक्षा प्रशिक्षण अथवा कायदेशीर शस्त्रांसाठी परवाना देण्याचे काम करत असेल, तर त्या बिझनेसला विक्रीशी संबंधित नसलेले मेसेजेस पाठवण्यासाठी WhatsApp प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. त्यांना त्यांच्या प्रॉडक्ट कॅटलॉगमध्ये शस्त्रे, दारुगोळा आणि स्फोटके सूचीबद्ध करता येणार नाहीत.
लागू कायद्याचे पालन करणे हे त्या बिझनेसवर अवलंबून असते. WhatsApp Business वर विक्री किंवा जाहिरात करण्यापासून प्रतिबंधित केलेल्या वस्तू आणि सर्व्हिसेसच्या अप-टू-डेट सूचीसाठी कॉमर्स पॉलिसी पहा.
एखाद्या ग्राहकाने कॉमर्स पॉलिसीमध्ये प्रतिबंधित केलेल्या व्हर्टिकल्समधील वस्तू किंवा सर्व्हिस खरेदी करण्याबद्दल संभाषण सुरू केल्यास, कृपया प्रतिबंधित केलेल्या व्हर्टिकल्सशी संबंधित अशा प्रकारच्या संभाषणांसाठी ग्राहकाला तुमच्यासोबत वेगळ्या चॅनलवर संपर्क साधण्यास सांगा.
संबंधित लेख:
WhatsApp Business प्लॅटफॉर्म पॉलिसी अंमलबजावणीविषयी माहिती
हे मदतीचे होते का?
होय
नाही