वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटला संग्रहित किंवा असंग्रहित कसे करावे

Android
iOS
KaiOS
Web
Windows
Mac
तुम्ही तुमच्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटला संग्रहित करून ते तुमच्या चॅट्स टॅबवरून लपवू शकता.
तुम्हाला नवीन मेसेज प्राप्त होतो, तेव्हा संग्रहित चॅट्स संग्रहितच राहतील. तुम्ही चॅट्स टॅबच्या वरती तुमचे संग्रहण ॲक्सेस करू शकता.

वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट संग्रहित करणे

  1. चॅट्स टॅबमध्ये तुम्ही लपवू इच्छिता त्या चॅटवर टॅप करा आणि धरून ठेवा.
  2. स्क्रीनच्या सर्वात वर असलेल्या
    archive chats
    वर टॅप करा.

सर्व चॅट्सना संग्रहित करणे

  1. चॅट्स टॅबवर,
    more options
    > सेटिंग्ज यावर टॅप करा.
  2. चॅट्स > पूर्वीचे चॅट > सर्व चॅट्सना संग्रहित करा > ठीक आहे यावर टॅप करा.

संग्रहित वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट पाहणे

  1. चॅट्स स्क्रीनवर सर्वात वरती स्क्रोल करा.
  2. archive chats
    वर टॅप करा.

वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटला असंग्रहित करणे

तुम्ही तुमची संग्रहित चॅट्स ॲक्सेस करू शकता आणि कोणत्याही वेळी चॅट असंग्रहित करण्याचा पर्याय निवडू शकता.
  1. चॅट्स स्क्रीनवर सर्वात वरती स्क्रोल करा.
  2. archive chats
    वर टॅप करा.
  3. तुम्हाला ज्या चॅटला किंवा ग्रुप चॅटला असंग्रहित करायचे आहे, त्यावर टॅप करून धरून ठेवा.
  4. स्क्रीनच्या सर्वात वरती असलेल्या
    unarchive chats
    वर टॅप करा.

वैकल्पिक संग्रहण सेटिंग्ज

तुम्‍हाला संग्रहित चॅटमध्‍ये नवीन मेसेज आल्‍यावर, चॅट बाय डिफॉल्‍ट संग्रहित राहील. नवीन मेसेजेस मिळाल्‍यावर चॅट असंग्रहित करा:
  1. तुमच्या चॅट्स टॅबवर,
    more options
    > सेटिंग्ज यावर टॅप करा.
  2. चॅट्स वर टॅप करा.
  3. चॅट्स संग्रहित केलेली राहू द्या बंद करा.
टीप:
  • चॅटला संग्रहित केल्याने ते हटवले जात नाही किंवा तुमच्या SD कार्डवर त्याचा बॅकअपदेखील घेतला जात नाही.
  • तुमचा उल्लेख केला गेला असेल किंवा तुम्हाला उत्तर दिले असेल, तरच तुम्हाला संग्रहित चॅट्ससाठी नोटिफिकेशन्स मिळतील.
  • @ या चिन्हाचा अर्थ एखाद्या व्यक्तीने संग्रहित ग्रुप चॅटमध्ये तुम्हाला उत्तर दिले आहे किंवा तुम्हाला नमूद केले आहे असा होतो.
  • कम्युनिटीचा भाग असलेला ग्रुप संग्रहित कसा करावा हे शोधा.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?

होय
नाही