बिझनेसेसना मेसेज करताना वापरायच्या नियंत्रणांविषयी माहिती

तुम्ही WhatsApp वर एखाद्या बिझनेसला मेसेज करता, तेव्हा नियंत्रण तुमच्या हातात असते. एखाद्या बिझनेससोबत तुमचा नंबर शेअर करावा की नाही हा निर्णय फक्त तुमचा असतो. तुम्ही एखाद्या बिझनेसला कधीही ब्लॉक करू शकता. WhatsApp तुमचा नंबर बिझनेसला देणार नाही आणि WhatsApp च्या धोरणांनुसार तुमची मंजुरी मिळाल्याशिवाय कोणत्याही बिझनेसला तुमच्याशी संपर्क साधता येणार नाही.
बिझनेसला ब्लॉक करणे किंवा त्याची तक्रार नोंदवणे
तुम्हाला एखाद्या बिझनेसकडून पहिल्यांदा मेसेज येतो, तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून पुन्हा मेसेज नको असेल, तर आम्ही तु्म्हाला त्या बिझनेसला ब्लॉक किंवा रिपोर्ट करायचा पर्याय देतो. बिझनेससोबत संवाद साधताना तुम्ही कोणत्याही क्षणी त्या बिझनेसच्या प्रोफाइलवरून त्या बिझनेसला ब्लॉक किंवा रिपोर्ट करू शकता.
तुम्ही एखाद्या बिझनेस खात्याला ब्लॉक करता, तेव्हा तुम्ही आम्हाला ब्लॉक करण्यामागचे कारणदेखील सांगू शकता, जसे की तुम्हाला यापुढे त्या बिझनेसला मेसेज करायची गरज नाही किंवा तुम्ही त्यांच्याकडून मेसेज मिळवण्याचा पर्याय निवडला नव्हता. आम्ही या ब्लॉक आणि रिपोर्ट माहितीचा वापर खात्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी किंवा त्यांच्या मेसेजेस पाठवण्यावर मर्यादा आणण्यासाठीदेखील करू शकतो.
मेसेजविषयी फीडबॅक शेअर करणे
बिझनेसेसने तुम्हाला पाठवलेल्या विशिष्ट चॅटविषयीचा फीडबॅकदेखील तुम्ही पाठवू शकता.
  1. WhatsApp उघडा.
  2. त्यानंतर बिझनेससोबतचे तुमचे चॅट उघडा.
  3. तुम्हाला जो मेसेज पुन्हा तपासायचा आहे, त्यावर टॅप करून धरून ठेवा.
  4. रेट करा वर टॅप करा.
  5. मेसेजला रेट करण्यासाठी ताऱ्यांची संख्या निवडा.
  6. सबमिट करा वर टॅप करा.
बिझनेसेसना त्यांच्या ग्राहकांसोबतच्या चॅट्समध्ये सुधारणा करण्यात मदत व्हावी यासाठी आम्ही या फीडबॅकचा वापर करू शकतो. हा फीडबॅक निनावी असतो, म्हणजेच फीडबॅक कोणी पाठवला हे बिझनेस आणि WhatsApp पाहू शकत नाही. बिझनेससोबतच्या तुमच्या मेसेजेसमध्ये काय आहे हे WhatsApp पाहत नाही.
हे मदतीचे होते का?
होय
नाही