पूर्वीचे चॅट Android वरून iPhone वर मायग्रेट करता न येणे

तुमचे WhatsApp मधील पूर्वीचे चॅट Android फोनमधून iPhone वर ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्याकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे:
 • तुमच्या Android डिव्हाइसवर Android OS Lollipop, SDK 21 किंवा त्यापुढील आवृत्ती अथवा Android 5 किंवा त्यापुढील आवृत्ती इंस्टॉल केलेली असणे
 • तुमच्या iPhone वर iOS 15.5 किंवा त्यापुढील आवृत्ती इंस्टॉल केलेली असणे
 • तुमच्या Android फोनवर Move to iOS ॲप इंस्टॉल केलेले असणे
 • तुमच्या नवीन डिव्हाइसवर WhatsApp iOS ची 2.22.10.70 किंवा त्यापुढील आवृत्ती असणे
 • तुमच्या जुन्या डिव्हाइसवर WhatsApp Android ची 2.22.7.74 किंवा त्यापुढील आवृत्ती असणे
 • तुम्ही तुमच्या नवीन डिव्हाइसवर तुमच्या जुन्या फोनवर वापरत असलेलाच फोन नंबर वापरणे
 • Move to iOS ॲपसह पेअर करण्यासाठी आणि तुमच्या Android फोनवरून डेटा घेण्यासाठी तुमचा iPhone पूर्णपणे नवा असणे किंवा फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट केलेला असणे आवश्यक आहे
 • तुमची दोन्ही डिव्हाइसेस चार्जिंगला लावलेली असणे आवश्यक आहे
 • तुमची दोन्ही डिव्‍हाइसेस एकाच वाय-फाय नेटवर्कशी जोडलेली हवी किंवा तुम्‍हाला तुमच्‍या Android डिव्‍हाइसला तुमच्‍या iPhone च्‍या हॉटस्‍पॉटशी जोडावे लागेल
माझ्या नवीन डिव्हाइसवर WhatsApp आधीपासूनच सुरू आहे किंवा मी इंपोर्ट पर्याय वगळला अथवा चुकवला आहे
तुम्हाला तुमच्या WhatsApp वरील पूर्वीचे चॅट तुम्ही तुमच्या नवीन फोनवर WhatsApp सक्रिय करण्यापूर्वीच रिस्टोअर करता येऊ शकते. तुम्हाला तुमचे पूर्वीचे मेसेजेस परत हवे असतील, तर तुम्ही हे करू शकता:
 1. तुमच्या iPhone वरील WhatsApp डिलीट करून पहा.
 2. तुमच्या Android फोनवरील WhatsApp वर पुन्हा नोंदणी करा.
 3. तुमच्या Android फोनवर Move to iOS सह नवीन ट्रान्सफर सुरू करा.
टीप: नवे आणि जुने मेसेजेस एकत्र करणे शक्य नाही.
माझ्या नवीन डिव्हाइसवर वेगळा फोन नंबर आहे
तुमचा WhatsApp डेटा नवीन फोन नंबरवर ट्रान्सफर करणे शक्य नाही. परंतु, तुम्ही नवीन फोन वापरण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या जुन्या डिव्हाइसवरील फोन नंबर बदलून त्याजागी तुमचा नवीन फोन नंबर टाकू शकता.
तुमच्या जुन्या डिव्हाइसवर तुमचा WhatsApp नंबर कसा बदलावा हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
Move to iOS ॲप सक्तीने बंद झाले किंवा ते वापरणे अयशस्वी झाले
तुम्हाला Move to iOS ॲप वापरताना समस्या येत असल्यास Apple सपोर्टशी संपर्क साधा.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही