संपर्क आणि तुमचे WhatsApp Business ॲप याविषयी माहिती

GDPR आणि तुमच्या डिव्हाइसच्या अ‍ॅड्रेस बुकमधील संपर्क
तुम्ही WhatsApp Business ॲप वापरता, तेव्हा तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या अ‍ॅड्रेस बुकमधील सर्व संपर्कांचे नियंत्रक असता. एक नियंत्रक म्हणून GDPR च्या अनुच्छेद ६ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे तुमच्याकडे तुमच्या संपर्कांवर प्रक्रिया करण्यासाठी कायदेशीर आधार असणे आवश्यक आहे. यांमध्ये कराराची आवश्यकता, स्वारस्य, संमती किंवा इतर कोणतेही उचित कायदेशीर आधार यांपैकी कोणत्याही कायदेशीर आधाराचा समावेश असू शकतो.
तुम्ही WhatsApp ला या संपर्कांचा ॲक्सेस देता, तेव्हा WhatsApp तुमचा डेटा प्रोसेसर म्हणून काम करते. त्यानंतर, तुम्ही या संपर्कांना WhatsApp वर मेसेज करू शकता का आणि तुमचे मेसेजेस इच्छित प्राप्तकर्त्यांना पाठवू शकता का, हे आम्ही झटपट ठरवतो. अधिक माहितीसाठी, आमच्या WhatsApp Business सेवाशर्तींमध्ये नमूद आणि समाविष्ट केलेल्या WhatsApp Business च्या डेटा प्रक्रियाशी संबंधित सेवाशर्ती पहा.
तुमच्या डिव्हाइसच्या अ‍ॅड्रेस बुकचा ॲक्सेस व्यवस्थापित आणि नियंत्रित करणे
तुम्ही WhatsApp ला कोणते संपर्क प्रदान करता हे नियंत्रित करण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या डिव्हाइसच्या अ‍ॅड्रेस बुकमध्ये समाविष्ट करण्याचा योग्य कायदेशीर आधार आहे असेच संपर्क जोडा. यामुळे होणारा फायदा म्हणजे, या पद्धतीमुळे तुम्हाला आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना डेटा गोपनीयतेशी संबंधित चांगल्या पद्धती वापरण्यास प्रोत्साहन मिळते. बिझनेस संपर्क आणि बिझनेससाठी वापरली जाणारी डिव्हाइसेस हे खाजगी संपर्क आणि डिव्हाइसेसपेक्षा वेगळे ठेवण्याने ग्राहकांच्या डेटाचा किंवा कंपनीच्या डिव्हाइसेसचा खाजगी वापरासाठी (आणि याउलट खाजगी डेटाचा किंवा डिव्हाइसेसचा कंपनीच्या वापरासाठी) होणारा गैरवापर टाळण्यात मदत होते.
तुम्हाला तुमचे सर्व बिझनेस आणि खाजगी संपर्क एकाच डिव्हाइसवर ठेवायचे असल्यास, अ‍ॅड्रेस बुक्स वेगवेगळी ठेवण्यात मदत करणारी टूल्स वापरून तुम्ही तुमच्या अ‍ॅड्रेस बुक्सचे विभाजन करू शकता.
हे मदतीचे होते का?
होय
नाही