मेसेजेस कसे हटवावेत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही मेसेजेस फक्त तुमच्यासाठीच हटवू शकता किंवा ते मेसेजेस सर्वांसाठी हटवण्याची विनंती करू शकता.
सर्वांसाठी मेसेजेस हटवणे
सर्वांसाठी मेसेजेस हटवणे ही सुविधा वापरून तुम्ही विशिष्ट मेसेजेसना एखाद्या वैयक्तिक चॅटमधून किंवा ग्रुप चॅटमधून हटवू शकता. तुम्ही एखादा मेसेज चुकीच्या ग्रुपमध्ये पाठवता किंवा मेसेजमध्ये काही चूक झालेली असते अशावेळी या सुविधेचा उपयोग होतो.
तुमच्याकडून सर्वांसाठी यशस्वीरीत्या हटवल्या गेलेल्या मेसेजेसच्या जागी पुढील मेसेज दिसेल:
हा मेसेज हटवला होता
मेसेज पाठवणाऱ्याने तो मेसेज सर्वांसाठी हटवला, तर त्याजागी पुढील मेसेज दिसेल:
हा मेसेज हटवला होता
सर्वांसाठी मेसेजेस हटवण्याकरिता हे करा:
  1. वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये तुम्हाला हटवायचा असलेला मेसेज निवडा.
  2. पर्याय > हटवा > सर्वांसाठी हटवा यावर प्रेस करा.
टीप:
  • सर्वांसाठी मेसेजेस यशस्वीरीत्या हटवण्याकरिता तुम्ही आणि प्राप्तकर्त्यांनी WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरणे आवश्यक आहे.
  • तुम्ही पाठवलेल्या मीडिया फाइल्स तो मेसेज WhatsApp चॅटमधून हटवलेला असतानाही iOS साठी WhatsApp वापरणाऱ्या‍ प्राप्तकर्त्यांच्या फोटोमध्ये सेव्ह केलेल्या असू शकतात.
  • हटवणे यशस्वी न झाल्यास किंवा हटवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर प्राप्तकर्त्यांना तो मेसेज दिसू शकतो.
  • सर्वांसाठी हटवणे यशस्वीरीत्या पूर्ण झाले की नाही याची सूचना तुम्हाला मिळणार नाही.
  • तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर तो सर्वांसाठी हटवला जाण्यासाठी तुमच्याकडे साधारण एक तास असेल.
  • अनेक मेसेजेस एकावेळी हटवण्याला KaiOS वर सपोर्ट नाही.
स्वतःसाठी मेसेजेस हटवणे
तुम्ही तुमच्या फोनमधून पाठवलेल्या किंवा प्राप्त केलेल्या मेसेजेसची तुमची कॉपी हटवू शकता. याचा तुमच्या प्राप्तकर्त्याच्या चॅटवर परिणाम होत नाही. तुमच्या प्राप्तकर्त्यांना त्यांच्या चॅट स्क्रीनमध्ये अजूनही मेसेजेस दिसतील.
स्वतःसाठी मेसेजेस हटवण्यासाठी हे करा:
  1. वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये तुम्हाला हटवायचा असलेला मेसेज निवडा.
  2. पर्याय > हटवा > माझ्यासाठी हटवा प्रेस करा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर मेसेजेस कसे हटवावेत: Android | iPhone
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही