मेसेजेस कसे हटवावेत
Android
iOS
KaiOS
Web
Windows
Mac
Android
iOS
KaiOS
Web
Windows
Mac
तुम्ही मेसेजेस फक्त तुमच्यासाठीच हटवू शकता किंवा ते मेसेजेस सर्वांसाठी हटवण्याची विनंती करू शकता. त्याऐवजी तुम्हाला मेसेज संपादित करायचा असल्यास, तुम्ही तो पाठवल्यानंतर १५ मिनिटांपर्यंत संपादित करू शकता.
तुम्ही मेसेजला बॅकअपमध्ये समाविष्ट केलेले नसल्यास, मेसेज हटवल्यानंतर तो परत मिळवण्याचा कोणताही मार्ग नसेल.
सर्वांसाठी मेसेजेस हटवणे
सर्वांसाठी मेसेजेस हटवणे ही सुविधा वापरून तुम्ही विशिष्ट मेसेजेसना एखाद्या वैयक्तिक चॅटमधून किंवा ग्रुप चॅटमधून हटवू शकता. तुम्ही एखादा मेसेज चुकीच्या ग्रुपमध्ये पाठवता किंवा त्यामध्ये काही चूक झालेली असते अशावेळी या सुविधेचा उपयोग होतो. ग्रुप ॲडमिन म्हणून तुम्ही चॅटमधील इतर सदस्यांनी पाठवलेले आक्षेपार्ह मेसेजेस हटवू शकता.
तुमच्याकडून पाठवल्या गेलेल्या आणि सर्वांसाठी हटवल्या गेलेल्या मेसेजेसच्या जागी पुढील मेसेज दिसेल:
“हा मेसेज हटवण्यात आला होता”
तुम्ही सर्वांना पाठवले आहेत असे मेसेजेस हटवण्यासाठी हे करा
- WhatsApp उघडा आणि तुम्हाला जो मेसेज हटवायचा आहे त्या चॅटमध्ये जा.
- मेसेजवर टॅप करून धरून ठेवा > मेनूमधून हटवा निवडा. किंवा, एकापेक्षा अधिक मेसेजेस हटवण्यासाठी अधिक मेसेजेस निवडा.
- सूचना दिसल्यास, वर टॅप करा > मेनूमधून हटवा निवडा.
- > सर्वांसाठी हटवा यावर टॅप करा.
ग्रुपमधील दुसऱ्या सदस्याने पाठवलेले मेसेजेस ग्रुप ॲडमिन्सना हटवता येतात. यामुळे ग्रुप ॲडमिन्सना अनुचित मेसेजेस किंवा मीडिया फाइल्स सर्वांसाठी हटवून खाजगी ग्रुप्स आणि कम्युनिटीजना व्यवस्थापित करता येते. एखादा अॅडमिन एखादा मेसेज सर्वांसाठी हटवतो, तेव्हा त्या मेसेजच्या जागी हा मेसेज दिसेल:
“हा मेसेज ॲडमिनने [अॅडमिनचे नाव] हटवला”
ग्रुपमधील दुसऱ्या एखाद्या सदस्याने पाठवलेला मेसेज हटवण्याकरिता हे करा
- WhatsApp उघडा आणि तुम्हाला जो मेसेज हटवायचा आहे त्या चॅटमध्ये जा.
- मेसेज टॅप करून होल्ड करा.
- > सर्वांसाठी हटवा > हटवा यावर टॅप करा.
टीप:
- तुम्ही आणि मेसेजच्या प्राप्तकर्त्यांनी WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरणे आवश्यक आहे.
- तुम्ही पाठवलेल्या मीडिया फाइल्स, तो मेसेज WhatsApp चॅटमधून हटवलेला असतानाही, iOS साठी WhatsApp वापरणाऱ्या प्राप्तकर्त्यांच्या फोटोमध्ये सेव्ह केलेल्या असू शकतात.
- हटवणे यशस्वी न झाल्यास किंवा हटवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर प्राप्तकर्त्यांना तो मेसेज दिसू शकतो.
- सर्वांसाठी हटवणे यशस्वीपणे झाले की नाही याची तुम्हाला सूचना मिळणार नाही.
- मेसेज पाठवल्यानंतर तो सर्वांसाठी हटवला जाण्याची विनंती करण्यासाठी तुमच्याकडे दोन दिवस असतात.
- ग्रुपमधील इतर सदस्यांनी पाठवलेले मेसेजेस फक्त ग्रुप ॲडमिन्सना हटवता येतात.
- एखाद्या सदस्याने एखादा मेसेज सर्वांसाठी हटवला जाण्याची विनंती केल्यानंतर तो मेसेज हटवण्यासाठी ग्रुप ॲडमिन्सकडे दोन दिवस असतात.
- कोणत्या ग्रुप ॲडमिनने मेसेज सर्वांसाठी हटवला हे ग्रुपमधील सदस्यांना पाहता येईल.
- ग्रुप ॲडमिनने हटवलेले मेसेजेस पुन्हा मिळवता येत नाहीत आणि त्यावर अपील करता येत नाही.
स्वतःसाठी मेसेजेस हटवणे
तुम्ही तुमच्या फोनमधून पाठवलेल्या किंवा प्राप्त केलेल्या मेसेजेसची तुमची कॉपी हटवू शकता. याचा परिणाम तुमच्या प्राप्तकर्त्याच्या चॅटवर होत नाही. तुमच्या प्राप्तकर्त्यांना त्यांच्या चॅट स्क्रीनमध्ये अजूनही मेसेजेस दिसतील.
- WhatsApp उघडा आणि तुम्हाला जो मेसेज हटवायचा आहे त्या चॅटमध्ये जा.
- मेसेजवर टॅप करून धरून ठेवा > त्यानंतर > माझ्यासाठी हटवा यावर टॅप करा. किंवा, एकापेक्षा अधिक मेसेजेस हटवण्यासाठी अधिक मेसेजेस निवडा.
टीप: माझ्यासाठी हटवा निवडल्यानंतर मेसेज कायमचा हटवण्यापूर्वी पूर्ववत करा वर टॅप करून ही कृती पूर्ववत करण्यासाठी तुमच्याकडे ५ सेकंद असतात. ५ सेकंदांनंतर, तुम्ही हटवलेले मेसेजेस रिकव्हर करू शकत नाही. कृपया लक्षात घ्या, की WhatsApp तुमच्यासाठी हटवलेले मेसेजेस रिकव्हर करू शकत नाही.
चॅटमधून मीडिया फाइल्स हटवणे
तुम्ही तुमच्या फोनमधून पाठवलेल्या किंवा प्राप्त केलेल्या मीडिया फाइल्सची तुमची कॉपी हटवू शकता. याचा परिणाम तुमच्या प्राप्तकर्त्याच्या चॅटवर होत नाही. तुमच्या प्राप्तकर्त्यांना त्यांच्या चॅट स्क्रीनमध्ये अजूनही मीडिया फाइल्स दिसतील.
- मीडिया फाइल्सवर टॅप करून धरून ठेवा.
- वर टॅप करा.
- पहिला मेसेज निवडल्यानंतर, तुम्ही वर टॅप करण्यापूर्वी हटवण्यासाठी इतर मेसेजेस निवडू शकता.
एका पायरीमध्ये चॅटमधून सर्व मीडिया फाइल्स हटवण्याचा कोणताही मार्ग नाही. एकाहून अधिक मीडिया फाइल्स हटवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खालील गोष्टी करणे:
- चॅट उघडा.
- चॅटसंबंधित माहितीच्या स्क्रीनवर जाण्यासाठी चॅटच्या नावावर टॅप करा.
- मीडिया फाइल्स, लिंक्स आणि डॉक्स वर टॅप करा.
- निवडा वर टॅप करा.
- कोणत्याही मीडिया फाइल्सना तुमच्या निवडीमध्ये जोडण्यासाठी त्यावर टॅप करा.
- वर टॅप करा.