WhatsApp वर सुरक्षित कसे राहावे

तुमची आणि तुमच्या मेसेजेसची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. WhatsApp वापरताना तुम्ही सुरक्षित राहावे यासाठी आम्ही कोणती टूल्स आणि फीचर्स केली विकसित आहेत ते तुम्ही जाणून घ्यावे असे आम्हाला वाटते.
आमच्या सेवाशर्ती
आमच्या सेवाशर्तींचे पालन करून तुम्ही WhatsApp वर सुरक्षित राहू शकता. आमच्या सेवाशर्ती निषिद्ध कृती नमूद करतात. या निषिद्ध कृतींमध्ये बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारा, भीतीदायक, छळणूक करणारा, तिरस्कार प्रकट करणारा, जातीय किंवा वांशिकदृष्ट्या आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर कृतीला चिथावणी अथवा प्रोत्साहन देणारा किंवा इतर काही कारणांनी आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणारा आक्षेपार्ह मजकूर (स्टेटस, प्रोफाइल फोटो किंवा मेसेजेसमधील) शेअर करण्याचा समावेश आहे. वापरकर्त्याने आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन केले आहे असे आमच्या लक्षात आल्यास आम्ही त्या वापरकर्त्याला बॅन करू शकतो.
कोणकोणत्या कृतींनी आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन होते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या सेवाशर्तींमधील "आमच्या सेवांचा अधिकृत वापर" हा विभाग जरूर वाचा. खात्यावरील बॅनविषयी तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता.
विचारपूर्वक शेअर करा
WhatsApp वरील तुमच्या संपर्कांसोबत एखादी गोष्ट शेअर करण्यापूर्वी त्यावर आधी नीट विचार करा. तुम्ही जे काही पाठवलेले आहे ते इतरांनी पाहावे असे तुम्हाला वाटते का, यावर विचार करा.
तुम्ही WhatsApp वरील एखाद्या संपर्कासोबत चॅट, फोटो, फाइल किंवा व्हॉइस मेसेज शेअर करता, तेव्हा त्यांच्याकडे या मेसेजेसची प्रत कायम राहणार असते. ते संपर्क हे मेसेजेस इतरांना फॉरवर्ड करू शकतात किंवा इतरांसोबत शेअर करू शकतात. 'एकदाच पहा' विषयी अधिक माहितीसाठी, हा लेख पहा.
WhatsApp मध्ये लोकेशन फीचरदेखील आहे. तुमचे लोकेशन WhatsApp मेसेजद्वारे शेअर करण्यासाठी तुम्ही हे फीचर वापरू शकता. तुमचा ज्या लोकांवर विश्वास आहे अशाच लोकांसोबत तुमचे लोकेशन शेअर करा.
WhatsApp चा जबाबदारीने वापर कसा करावा याविषयी या लेखामध्ये अधिक जाणून घ्या.
सुरक्षिततेशी संबंधित फीचर्स
WhatsApp वर आम्ही काही मुलभूत सुविधा प्रदान केल्या आहेत ज्या वापरून तुम्ही सुरक्षित राहू शकता.
गोपनीयता सेटिंग्ज
तुमची माहिती कोण पाहू शकेल यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमची गोपनीयता सेटिंग्‍ज बदला. तुम्ही तुमचे 'अखेरचे पाहिलेले' आणि 'ऑनलाइन', प्रोफाइल फोटो, 'माझ्याबद्दल' किंवा स्टेटस खालीलपैकी एका पर्यायावर सेट करू शकता:
  • सर्वजण: सर्व वापरकर्ते तुमचा 'प्रोफाइल फोटो', 'माझ्याबद्दल' किंवा 'स्टेटस' पाहू शकतील.
  • माझे संपर्क: फक्त तुमच्या ॲड्रेस बुकमधील संपर्क तुमचे 'अखेरचे पाहिलेले' आणि 'ऑनलाइन', प्रोफाइल फोटो, 'माझ्याबद्दल' किंवा 'स्टेटस' पाहू शकतात.
  • यांना वगळून माझे संपर्क…: तुम्ही वगळलेले संपर्क सोडून तुमच्या ॲड्रेस बुकमधील इतर संपर्क तुमचे 'अखेरचे पाहिलेले' आणि 'ऑनलाइन', प्रोफाइल फोटो, 'माझ्याबद्दल' किंवा 'स्टेटस' पाहू शकतात.
  • कोणीही नाही: कोणीही तुमचे 'अखेरचे पाहिलेले' आणि 'ऑनलाइन', प्रोफाइल फोटो, 'माझ्याबद्दल' किंवा 'स्टेटस' पाहू शकत नाही.
टीप: तुम्ही संपर्क म्हणून सेव्ह केलेले वापरकर्ते किंवा तुम्ही ज्यांना आधी मेसेज केला आहे अशा व्यक्ती तुमचे 'अखेरचे पाहिलेले' आणि 'ऑनलाइन' पाहू शकतात.
पुढील प्लॅटफॉर्म्सवर गोपनीयता सेटिंग्जविषयी जाणून घ्या: Android | iPhone
वाचल्याची पोचपावती
तुम्ही वाचल्याची पोचपावती बंद करू शकता. तुम्ही वाचल्याची पोचपावती बंद केली, तर तुम्ही वाचल्याची पोचपावती पाठवू शकणार नाही किंवा तुम्हाला ती मिळणार नाही. तुम्ही तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमधून पोचपावत्या बंद केल्या असतील, तरी ग्रुप चॅटमध्ये नेहमीच पोचपावती पाठवली जाते हे लक्षात असू द्या. पुढील प्लॅटफॉर्म्सवर 'वाचल्याची पोचपावती' विषयी जाणून घ्या: Android, iPhone किंवा KaiOS.
पुढील प्लॅटफॉर्म्सवर गोपनीयता सेटिंग्जविषयी जाणून घ्या: Android | iPhone
संपर्कांना किंवा मेसेजेसना ब्लॉक करणे आणि त्यांची तक्रार नोंदवणे
आक्षेपार्ह आशय आणि तो पाठवणारे संपर्क त्यांची तक्रार तुम्ही आमच्याकडे नोंदवावी हे आम्ही सुचवतो. WhatsApp वर विशिष्ट संपर्कांना ब्लॉक करून किंवा मेसेजेस अथवा संपर्कांची तक्रार नोंदवून तुम्ही कोणाशी संवाद साधायचा यावर नियंत्रण ठेवू शकता. तुम्हाला एकदाच पाहता येणारा फोटो किंवा व्हिडिओ मिळतो, तेव्हा तुम्ही त्या खात्याची तक्रार थेट मीडिया व्ह्यूअरमधून नोंदवू शकता. आमचे 'ब्लॉक करा आणि तक्रार नोंदवा' फीचर वापरल्यास काय घडते आणि ते कसे वापरावे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
सुरक्षिततेसंबंधी आणखी काही स्रोत
तुम्हाला किंवा इतर कोणालाही धोका आहे असे वाटल्यास कृपया तुमच्या भागातील लोकल इमर्जन्सी सर्व्हिसशी संपर्क साधा.
एखादी व्यक्ती स्वतःला इजा करून घेणार आहे असे तुम्हाला वाटले आणि तुम्हाला त्यांच्या सुरक्षेबद्दल काळजी वाटत असेल, तर कृपया तुमच्या भागातील लोकल इमर्जन्सी सर्व्हिसशी संपर्क साधा किंवा आत्महत्या प्रतिबंध हॉटलाइनला कॉल करा.
एखाद्या आशयामध्ये लहान मुलांवर अन्याय किंवा अत्याचार होत असल्याचे सूचित होत असेल, तर कृपया National Center for Missing and Exploited Children (NCMEC) शी संपर्क साधा. तुम्ही वापरकर्त्याची तक्रारही नोंदवू शकता. तक्रार करण्याविषयी येथे अधिक जाणून घ्‍या. कृपया तुमच्या तक्रारीत मजकुराचा कोणताही स्क्रीनशॉट समाविष्ट करू नका.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही