इंटरनॅशनल फोन फॉरमॅट विषयी माहिती

"संपूर्ण इंटरनॅशनल फोन नंबर फॉरमॅट" म्हणजे त्यामध्ये अगोदर (+) हे चिन्ह असते त्यानंतर कंट्री कोड, शहराचा कोड आणि स्थानिक फोन नंबर समाविष्ट असतो. तुम्ही जेव्हा WhatsApp शी संपर्क करता तेव्हा तुमचा फोन नंबर संपूर्ण इंटरनॅशनल फॉरमॅट मध्ये पाठविणे गरजेचे आहे.
उदाहरणार्थ, जर संपर्क अमेरिका (कंट्री कोड "1") देशातील असेल आणि एरिया कोड "408" व फोन नंबर "XXX-XXXX" असेल तर तुम्ही तो नंबर +1 408 XXX XXXX असा एंटर करा.
टीप :
  • खात्री करून घ्या की नंबरच्या सुरुवातीला कोणतेही अतिरिक्त शून्य किंवा कोणताही विशिष्ट कोड लावलेला नाही.
  • अर्जेंटिना (कंट्री कोड "54") मधील सर्व फोन नंबर्स साठी कंट्री कोड आणि एरिया कोड यामध्ये "9" एंटर करणे गरजेचे आहे. तसेच सुरुवातीचे "15" काढून टाकणे गरजेचे आहे ज्यामुळे शेवटी फोन नंबर मध्ये 13 अंक असतील : +54 9 xxx xxx xxxx
  • मेक्सिको (कंट्री कोड "52") मधील फोन नंबर्स साठी "+52" नंतर "1" लावणे गरजेचे आहे , ते Nextel नंबर्स असेल तरीही हे करावे लागेल.
संबंधित लेख :
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही