टू-स्टेप व्हेरिफिकेशन विषयी माहिती
टू-स्टेप व्हेरिफिकेशन हे तुमच्या WhatsApp खात्याला अतिरिक्त सुरक्षा देऊ करणारे पर्यायी फीचर आहे. तुम्ही WhatsApp वर तुमचा फोन नंबर यशस्वीरीत्या नोंदवल्यानंतर तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशनची स्क्रीन दिसेल. टू-स्टेप व्हेरिफिकेशन कसे सुरू करावे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
तुम्ही टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करता, तेव्हा तुमच्याकडे ईमेल ॲड्रेस एंटर करण्याचा पर्याय असतो. तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास WhatsApp तुम्हाला या ॲड्रेसवर रिसेट लिंक ईमेल करते आणि तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यातदेखील मदत करते.
तुमचा पिन नंबर लक्षात ठेवण्यात मदत करण्यासाठी WhatsApp तुम्हाला अधूनमधून पिन नंबर एंटर करण्याची सूचना देईल. हे बंद करण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर बंद करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. टू-स्टेप व्हेरिफिकेशन सेटिंग्ज कशी व्यवस्थापित करावीत याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
टीप: टू-स्टेप व्हेरिफिकेशन पिन नंबर आणि तुम्हाला एसएमएस किंवा फोन कॉलद्वारे मिळतो तो ६ अंकी नोंदणी कोड, हे दोन्ही नंबर वेगळे असतात. नोंदणी करण्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
संबंधित लेख: