'Messenger रूम्स' विषयी माहिती

'Messenger रूम्स' च्या मदतीने तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांना, मित्रमैत्रिणींना तसेच समविचारी व्यक्तींना कॉल करून त्यांच्यासोबत वेळ घालवणे शक्य होते. तुम्ही Facebook चे Messenger ॲप वापरून किंवा तुमच्या मोबाइल/वेब ब्राउझरमधून Messenger वेबसाइटवर जाऊन चॅटसाठी रूम्स तयार करू शकता. या रूम्समध्ये मोठ्या ग्रुप्समधील व्यक्तींना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधणे शक्य होते. तुम्ही तुमच्या संपर्कांना किंवा WhatsApp मधील ग्रुप चॅट्सना या रूम्समध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण लिंक पाठवू शकता. Facebook खाते किंवा Messenger ॲप नसणाऱ्या व्यक्तीदेखील या लिंकद्वारे रूम्समध्ये सामील होऊ शकतात.
Messenger रूम्सचे शॉर्टकट्स यापुढे WhatsApp मध्ये उपलब्ध नसतील. Messenger हे ॲप आणि वेबसाइट अशा दोन स्वरूपात उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला रूम तयार करायची असेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या Facebook खात्याने लॉग इन करावे लागते. रूम्समधील संभाषणे WhatsApp च्या बाहेर घडतात आणि 'Messenger रूम्स' मधील व्हिडिओ चॅट्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेली नसतात.
तुम्ही रूमची लिंक ज्या WhatsApp वापरकर्त्यासोबत शेअर करता तो वापरकर्ता रूममध्ये सामील होऊ शकतो, त्यामुळे ही लिंक विश्वासू लोकांसोबतच शेअर करा. ज्या व्यक्तीकडे रूमची लिंक आहे त्या व्यक्तीला ती लिंक इतरांना फॉरवर्ड करता येऊ शकते. त्यामुळे, तुम्ही ज्या व्यक्तींना स्वत:हून रूमची लिंक पाठवलेली नाही त्या व्यक्तीदेखील रूममध्ये सामील होऊ शकतात.
'Messenger रूम्स' हे Messenger द्वारे निर्मित आणि त्याच्या मालकीचे फीचर आहे. WhatsApp ज्या भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्या सर्व भाषांमध्ये Messenger आणि Meta ची इतर प्रॉडक्ट्स उपलब्ध असतीलच असे नाही. त्यामुळे, तुम्हाला Messenger कडून आलेले काही मेसेजेस किंवा लिंक्स तुमच्या फोन किंवा कॉंप्युटरच्या प्राधान्य दिलेल्या भाषेशिवाय इतर भाषेत दिसू शकतात. तुम्ही 'Messenger रूम्स' किंवा Meta ची इतर प्रॉडक्ट्स वापरता, तेव्हा त्या सेवांच्या वापरावर त्यांच्या स्वतःच्या अटी आणि गोपनीयता शर्ती लागू होतात. 'Messenger रूम्स' विषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया हा लेख वाचा. WhatsApp इतर Meta कंपन्यांसह कसे काम करते हे जाणून घेण्यासाठी आमच्या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण पहा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही