एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप सुरू आणि बंद कसा करावा
फक्त तुम्ही आणि तुम्ही ज्या व्यक्तीसोबत बोलत आहात ती व्यक्ती, यांनाच तुमच्यामध्ये पाठवले गेलेले व प्राप्त केलेले सर्व वैयक्तिक मेसेजेस वाचता किंवा ऐकता यावेत याची खात्री करण्यासाठी, WhatsApp त्या मेसेजेसना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित करते. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअपच्या मदतीने तुम्ही तुमच्या iCloud आणि Google Drive बॅकअप्सनाही समतुल्य संरक्षण जोडू शकता.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप सुरू करणे
- सेटिंग्ज उघडा.
- चॅट > चॅट बॅकअप > एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप यावर टॅप करा.
- सुरू करा वर टॅप करा, त्यानंतर पासवर्ड किंवा एन्क्रिप्शन की तयार करण्यासाठी सूचना फॉलो करा.
- तयार करा वर टॅप करा आणि WhatsApp ने तुमचा एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप तयार करण्याची प्रतीक्षा करा. तुम्हाला फोनचे चार्जिंग सुरू करावे लागू शकते.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप बंद करणे
- सेटिंग्ज उघडा.
- चॅट > चॅट बॅकअप > एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप यावर टॅप करा.
- बंद करा वर टॅप करा.
- तुमचा पासवर्ड एंटर करा.
- बंद करा वर टॅप करून तुम्हाला एन्क्रिप्टेड बॅकअप बंद करायचा आहे हे कन्फर्म करा.
आम्ही तुमचा डेटा, ज्यामध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअपचाही समावेश होतो, कशाप्रकारे गोळा करतो आणि त्यावर कशाप्रकारे प्रक्रिया करतो याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी, कृपया WhatsApp चे गोपनीयता धोरण पहा.
संबंधित लेख